आयसीसी टी२० विश्वचषकाच्या साखळी फेरीतील सर्व सामने जिंकणाऱ्या पाकिस्तान संघाला उपांत्य फेरी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने गुरुवार रोजी (११ नोव्हेंबर) दुबईत झालेल्या उपांत्य फेरी सामन्यात पाकिस्तानला ५ विकेट्सने धूळ चारली आहे. भलेही पाकिस्तानचा संघ हा सामना गमावत टी२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे. परंतु पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याने त्याचे देशप्रेम दाखवत कोट्यवधी मने जिंकली आहेत.
रिझवानचा एक धक्कादायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. क्रिकेट चाहत्यांसह पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत रिझवान रुग्णालयात बेडवर झोपला असल्याचे दिसत आहे.
रिझवानला भरती करण्यात आलेल्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तो उपांत्य सामन्यापूर्वी छातीशी संबंधित समस्येचा सामना करत होता. याच कारणास्तव त्याला ९ नोव्हेंबर रोजी जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तिथे २ रात्र त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. पुढे उपांत्य सामन्याच्या दिवशी अर्थात ११ नोव्हेंबरला सकाळी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर तो संध्याकाळी ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरला होता.
Can you imagine this guy played for his country today & gave his best.
He was in the hospital last two days.
Massive respect @iMRizwanPak .
Hero. pic.twitter.com/kdpYukcm5I— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 11, 2021
डॉक्टरांनी रिझवानच्या तब्येतीविषयी माहिती देताना सांगितले की, रिझवान वेगाने त्याच्या दुखापतीतून सावरला आणि उपांत्य सामन्याआधी तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला होता.
— Hassam (@Nasha_e_cricket) November 11, 2021
याच रिझवानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरी सामन्यात पाकिस्तान संघाकडून सर्वाधिक धावा फटकावल्या आहेत. सलामीला फलंदाजीला येत या यष्टीरक्षक फलंदाजाने ५२ चेंडूंमध्ये ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या होत्या. या खेळीसह रिझवानने इतिहास रचला आहे. त्याने २०२१ वर्षातील आपल्या टी२० क्रिकेटमधील १००० धावांचा पल्ला गाठला गाठला आहे. यासह रिझवान टी२० क्रिकेटमध्ये एका वर्षात १००० धावा करणारा पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू बनला आहे.
याव्यतिरिक्त रिझवान हा क्रिकेटच्या एका स्वरुपात एका वर्षात पहिलेवहिले एक हजारी मनसबदार बनलेल्या दिग्गजांच्या मांदियाळीतही सहभागी झाला आहे. कसोटी स्वरुपात सर्वप्रथम क्लेम हिलने (१०६० धावा) एका वर्षात १००० धावा केल्या होत्या. १९०२ साली त्यांनी हा पराक्रम केला होता. वनडे क्रिकेटमध्ये १९८३ मध्ये डेविड गोवर यांनी हा किर्तीमान केला होता. त्यांनी त्यावर्षी १०८६ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर रिझवान टी२० क्रिकेटमध्ये हा भीमपराक्रम करणारा पहिला क्रिकेटपटू बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सेमी फायनल गमावली, पण पाकिस्तानच्या रिझवानचा ‘भीमपराक्रम’; टी२०त एका वर्षात कुटल्या १००० धावा
‘तो’ मॅच विनिंग झेल सोडणाऱ्या हसन अलीचेही भर मैदानात पाणावले डोळे, पाहा तो भावनिक क्षण