अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांचा महत्त्वाचा खेळाडू मोह्म्मद शहजादला नोटीस बजावत एक महिन्याच्या आत मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या मोह्म्मद शहजाद हा पाकिस्तानमधील पेशावर येथे वास्तव्यास आहे. जर मोह्म्मद शहजाद एक महिन्याच्या आत अफगानिस्तानमध्ये परतला नाही तर त्याचा अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाशी असलेला करार देखील संपुष्टात येऊ शकतो.
काही दिवसापुर्वीच मोहमद शहजादने अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाच्या परवानगी शिवाय पाकिस्तानमधील स्थानिक स्पर्धेत भाग घेतला होता. त्यासाठी त्याला 2.5 लाखाचा दंडही आकरण्यात होता.
मोह्म्मद शहजाद सध्या आयसीसी रॅंकिगमध्ये 9व्या स्थानी आहे.
अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या देशाच्या बाहेर असलेल्या खेळाडूंवर कडक कारवाई करण्यास सुरवात केली. त्यांनी देशाच्या बाहेर असलेल्या सर्व खेळाडूंना नोटीस बजावत 1 महिन्याच्या आत देशात परतण्यास सांगितले आहे.
अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आतिफ मशाल म्हणाले की, ज्या खेळाडूंचा बोर्डाशी एक वर्षाचा करार आहे, ते खेळाडू बोर्डाच्या परवानगी शिवाय परदेशी जावू शकत नाहीत. जे खेळाडू बाहेर आहेत त्यांनी 1 महिन्याच्या आत परिवाराबरोबर मायदेशी परतावे अन्यथा त्यांचा करार रद्द करण्यात येईल.