---Advertisement---

‘जेवढा लांब षटकार कोहली मारतो, त्यापेक्षा लांब मारू शकतो,’ ९० किलोच्या ‘या’ खेळाडूचे विराटला आव्हान

On: बुधवार, नोव्हेंबर 3, 2021 10:17 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या जबरदस्त फिटनेससाठी जगभरात नावाजला जोतो. विराट त्याची फिटनेस कायम ठेवण्यासाठी खास डायटींगही करतो. तो त्याच्या जेवणात अशा गोष्टी खातो, ज्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. मात्र, अफागाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शहजादच्या दृष्टीने फिटनेस जास्त महत्वाची नाही. मोहम्ममद शहजादचे वजन ९० किलोपेक्षा जास्त असून तो अफगाणिस्तान संघाचा भाग आहे. अशात त्याने तो विराट कोहलीपेक्षा मोठा षटकार मारू शकतो, असे म्हटले आहे.

क्रिकेट जगतात दिवसेंदिवस खेळाडूंच्या फिटनेस एका वेगळ्याच उंचीवर पोहोचत असल्याचे दिसत आहे. मात्र, अफगाणिस्तानचा मोहम्मद शहजाद मात्र याविषयी गंभीर दिसत नाही. त्याच्या फिटनेसविषयी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. पण शहजादच्या मते तो ९० किलो वजन असतानाही चांगले प्रदर्शन करू शकतो. अशातच आता त्याने थेठ भारताचा कर्णधार विराट कोहलीलाच आव्हान दिले आहे.

शहजादच्या फिटनेसवर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांविषयी त्याने स्वत:चे मत स्पष्ट केले आहे. त्याने याविषयी इंडियन एक्सप्रेससोबत चर्चा केली आहे. तो यावेळी म्हणला की, “हे पाहा मी फिटनेसही पूर्णपणे करतो आणि जेवणही पूर्ण करतो. तुम्ही जर माझ्याकडून विराट कोहलीप्रमाणे फिटनेसची अपेक्षा करत असाल, तर ते शक्य नाही, पण मी याच्यावर काम करत आहे. प्रत्येक जण विराटप्रमाणे होऊ शकत नाही. जेवढा लांब षटकार कोहली मारतो, त्यापेक्षा लांब षटकार मारू शकतो, तर मग त्याच्यासारखा डायट करण्याची काय गरज आहे ?”

शहजादच्या फिटनेसविषयी अनेकदा अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, शहजादने त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर संघातील स्थान कायम राखले आहे. मोहम्मद शहजाद आजही अफगाणिस्तान संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटचा विचार केला, तर तो अफगाणिस्तानसाठी मोहम्मद नबीनंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

विक्रमवीर गप्टिल! विराटनंतर ‘अशी’ कामगिरी करणारा बनला केवळ दुसरा फलंदाज

विजयरथावर स्वार इंग्लंडला हादरा; ‘हा’ प्रमुख खेळाडू झाला स्पर्धेबाहेर

बिग ब्रेकिंग! राहुल द्रविड दिसणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी, बीसीसीआयची अधिकृत घोषणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---