भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला कोलकाता हाय कोर्टात झटका बसला आहे. त्याची पत्नी हसीन जहाँने त्याच्याविरुद्ध कोर्टात विजय मिळवला आहे. 5 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अलीपूर जिल्हा न्यायालयाने हसीन जहाँने 10 लाख रुपयांच्या मासिक उत्पन्नासाठी दाखल केलेली याचिका फेटाळली. आयकर विभागाच्या माहितीनुसार, शमीचे वार्षिक उत्पन्न 7.19 कोटी रुपये आहे. पत्नी हसीन जहाँला दरमहा 1 लाख 30 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दर महिन्याच्या 10 तारखेला ही रक्कम देण्यात यावी असे देखील नमूद करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अनिंदिता गांगुली यांनी शमीला हा आदेश दिला.
कोर्टाने दोन्ही बाजूंचा पूर्ण विचार करून हा निर्णय दिला आहे. हसीन जहॉं दुसरे लग्न केल्याचा कोणताही पुरावा नसल्याने ही रक्कम शमयाला देणे बंधनकारक राहील असे देखील म्हटले गेले. तर, मागील आर्थिक वर्षाचा संदर्भ देत ही रक्कम केवळ 1 लाख 30 हजार इतकीच ठेवण्यात आली.
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यांना एक मुलगी आहे. मोहम्मद शमी अनेकदा आपल्या मुलीबद्दल पोस्ट शेअर करत असतो. 2018 मध्ये हसीन जहाँने शमीवर अनेक आरोप केले होते. त्यानंतर शमी आणि हसीन जहाँमध्ये मोठा वाद निर्माण झालेला. हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचार आणि मारहाणीचे आरोप केले होते. या प्रकरणाने चांगलाच पेट घेतला होता आणि सोशल मीडियावर याविषयी बरीच चर्चा झालेली.
(Mohammad Shami And Haseen Jahan Case In Court 50 Thousand Alumni For Month)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रणजी सोडा आणि बुधवारपर्यंत रांचीत पोहोचा, पृथ्वी शॉसह ‘या’ खेळाडूंना बीसीसीआयचा आदेश
“सूर्या आणि बटलर कुठेही धावा करू शकतात,” स्वतः दिग्गज गोलंदाजानेच केलं कौतुक