न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बॉन्ड यांनी भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव आणि इंग्लंडचा दिग्गज जोस बटलर यांचे तोंड भरून कौतुक केले. बॉन्ड सध्या एसएलटी20 मध्ये एमएय अमिरात संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. सूर्यकुमार यादव आणि जोस बटलर यांनी मागच्या वर्षभरात स्वतःच्या टी-20 प्रदर्शनाने अनेक मोठ्या खेळाडूंना देखील प्रभावित केले आहे. यातच आता शेन बॉन्ड यांचे नाव देखील सामील झाले.
जोस बटलर (Jos Buttler) याच्यासाठी आयपीएल 2022 हंगाम खास राहिला. रायजस्थान रॉयल्ससाठी खेळताना बटलर अनेक सामन्यांमध्ये मॅच विनर ठरला. तर दुसरीकडे सूर्यकुमरा यादव (Suryakumar Yadav) मागच्या वर्षभरात भारतीय संघासाठी वादळी खेळी करताना दिसला आहे. या दोघांचे प्रदर्शन खासकरून टी-20 फॉरमॅटमध्ये जबरदस्त राहिले आहे. न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बॉन्ड (Shane Bond ) याने या दोघांच्या प्रदर्शनावर खास लक्ष ठेवले आणि यासाठी त्यांचे कौतुक देखील केले.
सूर्यकुमार यादव याची तुलना अनेकदा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स याच्याशी केली जाते. कारण सूर्या फलंदाजी करत असताना कोणता चेंडू कोणत्या दिशेला मारेल, याचा नेम नसतो. गोलंदाजाला देखील याचा अंदाज बांधने कठीण असते. जोस बटलर देखील या बाबतीत कुठेच मागे पडल्याचे दिसत नाही. सूर्यकुमार आणि बटलर यांनी मैदानात 360 डिग्री खेळलेले शॉट्स पाहून बॉन्ड देखील त्यांचा चाहता बनल्याचे दिसते. बॉन्डच्या मते सूर्यकुमार आणि बटलर त्यांच्या 360 डिग्री खेळण्याच्या शैलीच्या जोरावर कोणत्याही मैदानावर धावा करू शकतात.
खेळाच्या पद्धतीत बदल होत आहे – शेन बॉन्ड
बॉन्डच्या मते क्रिकेटममध्ये मागच्या काही वर्षात मोठे बदल झाले आहेत. माध्यमांशी बोलताना बॉन्ड म्हणाला, “माझ्या मते क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये बदल झाले आहेत. आपण या गोष्ट पाहिल्या आहेत, कसोटी क्रिकेट आणि टी-20 क्रिकेट खेळण्याच्या पद्धतीत वेगाने बदल होत आहेत. 360 डिग्री सूर्यकुमार यादव आणि जोस बटलर यांच्यासारखे खेळाडू कुठेही धावा करू शकतात आणि मोठे शॉट्स खेळताना त्यांना भीती वाटत नाही.”
शेन बॉन्ड याला सर रिचर्ड हेडली () यांच्यानंतर न्यूझीलंडचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हटले जाते. बॉन्डने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीती 18 कसोटी, 82 वनडे आणि 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या फॉरमॅट्समध्ये त्याने अनुक्रमे 86, 147 आणि 25 विकेट्स घेतल्या. सध्या बॉन्ड प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे आणि सूर्यकुमार आणि जोस बटलरसारख्या फलंदाजांमुले त्याला स्वतःचे काम आवडते. “मला हे काम आवडते, कारण जगातील सर्वोत्तम फलंदाजांना असे खेळताना मला चांगले वाटते आणि मी स्वतःचे काम करत आहे,” असे बॉन्ड पुढे बोलताना म्हणाला. (Shane Bond praised Suryakumar Yadav and Jos Buttler)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हॉकी विश्वचषकातील पराभवाचा बदला टीम इंडिया क्रिकेटमध्ये घेणार? तिसऱ्या वनडेत भारताकडे क्लीन स्वीपची संधी
‘क्रिकेट कोणताही सामान्य खेळ नाहीये…’, भारताच्या दुखापतग्रस्त खेळाडूंवर भडकले कपिल देव