मंगळवारी (दि. 24 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेची सांगता होणार आहे. इंदोरच्या होळकर स्टेडिअमवर दुपारी 1.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने भारतीय संघाने आपल्या नावावर केले आहेत. मात्र, हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेत रविवारी (दि. 22 जानेवारी) न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत केले. तसेच, भारताला या विश्वचषकातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. अशात आता अनेक भारतीय चाहते अपेक्षा करत आहेत की, भारतीय संघ तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडला पराभूत करत हॉकीमध्ये मिळालेल्या पराभवाच्या जखमांवर मलम लावण्याचे काम करेल.
भारताच्या बाजूने राहिलाय स्टेडिअमचा विक्रम
भारतीय संघाने होळकर स्टेडिअममध्ये आतापर्यंत खेळलेल्या सर्व वनडे सामन्यात विजय मिळवला आहे. होळकर स्टेडिअममध्ये मर्यादित षटकांच्या वनडे क्रिकेट प्रकारात न्यूझीलंड पहिल्यांदाच भारतीय संघासमोर असेल. मात्र, मध्यप्रदेश क्रिकेट संघाचे हे स्टेडिअमचा 17 वर्षांपूर्वीचा विक्रम भारताच्या बाजूने राहिला आहे.
यजमान भारतीय संघाने यादरम्यान 2006पासून ते 2017पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या पाच वनडे सामन्यात विजय मिळवला आहे. या क्रिकेट प्रकारात भारताने इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांना धूळ चारली आहे.
न्यूझीलंडला कसोटी सामन्यात 321 धावांनी केले होते पराभूत
दुसरीकडे, न्यूझीलंडने होळकर स्टेडिअममध्ये आतापर्यंत कसोटी क्रिकेट प्रकारातील फक्त 1 सामना खेळला आहे. 2016मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 321 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले होते. हा सामना जवळपास 27 हजार प्रेक्षक क्षमता असणाऱ्या या स्टेडिअमच्या इतिहासातील पहिला कसोटी सामना होता.
मागील दोन पराभवाचा हिशोब चुकता करण्याचा असेल न्यूझीलंडचा प्रयत्न
होळकर क्रिकेट स्टेडिअममध्ये मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंड संघ मागील दोन पराभवाचा हिशोब चुकता करण्यासाठी उतरेल. रायपूर येथे 21 जानेवारी रोजी खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणाने न्यूझीलंडच्या कमकुवत फलंदाजी आक्रमणाचा काटा काढला होता. त्यामुळे भारताला या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवण्यात यश आले होते. तसेच, या मालिकेत भारताने 2-0ने विजयी आघाडी घेतली होती. दुसरीकडे, आता तिसऱ्या वनडेत भारतीय संघाकडे न्यूझीलंडला पराभूत करत क्लीन स्वीप देण्याची संधी आहे. (team india has chance to do cleen sweep against new zealand in 3rd odi indore read here)
तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.
न्यूझीलंड संघ-
टॉम लॅथम (कर्णधार), फिन ऍलन, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवॉन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिचेल, हेन्री निकोलस, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, हेन्री शिप्ले, ईश सोधी, ब्लेअर टिकनर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्या बात है! अचानक पुनरागमन करताच जडेजाच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी, वाचा सविस्तर
शमी आहे कोट्यवधी किंमतीच्या स्पोर्ट्स कारचा मालक; व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ‘स्पीड मॅटर करते’