भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत शमी भारतीय संघासाठी मैदानात पुनरागमन करणार होता. परंतु ऐन वेळी कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आल्यानंतर त्याला या मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. परंतु आता आफ्रिकी संघासोबत खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेतून तो संघात पुनरागमन करू शकतो.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका बुधवारी, 28 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपुरममध्ये केळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहम्मद शमीला खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. त्याने मागच्या मोठ्या काळापासून भारतासाठी टी-20 सामना खेळला नाहीये. पण आता तो लवकरच टी-20 संघात पुनरागमन करणार आहे. आफ्रिकेविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी मोहम्मद शमी (Mohammad Shami) याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे समोर आले आहे. त्याने स्वतः अधिकृत इंस्टाग्राम स्टोरिवर कोरोना अहवालाचा फोटो शेअर केला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यासाठी तो उपस्थित राहण्याची कसलीही शक्यता नाहीये. पण मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तो नक्कीच संघासोबत जोडला जाऊ शकतो. आफ्रिकेविरुद्धचा दुसरा टी-20 सामना 2 ऑक्टोबर रोजी गुवाहाटीमध्ये खेळला जाणार आहे. शमीने मागच्या वर्षी पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात नामिबियाविरुद्ध खेळला होता. नोव्हेंबर 2021 मध्ये खेळलेल्या या सामन्यानंतर शमीला अद्याप एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाहीये.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका संपल्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक 2022 चे आयोजन केले गेले आहे. भारतीय संघाने या विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 सदस्यीय संघात देखील शमीला जागा दिली गेली नाहीये. त्याला राखीव खेलाडूंमध्ये ठेवले गेले आहे. अशात त्याला विश्वचषकात खेळण्याची संधी मिळणे खूपच अवघड दिसत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘टी-20 हा फलंदाजांचा खेळ’, भारताविरुद्धची मालिका सुरू होण्याआधी आफ्रिकी गोलंदाजांचे मोठे विधान
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेविषयी दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचे मोठे विधान, पाहा काय म्हणाला बावुमा






