नवी दिल्ली| ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी दोन ते अडीच महिन्यांपर्यंत आयपीएल खेळणे चांगले राहील, असे भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला वाटते.
आयपीएलचा बहुप्रतिक्षित दौरा 10 नोव्हेंबरला संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारतीय खेळाडू विमानातून थेट ऑस्ट्रेलियाला जाईल. तिथे टी20 मालिका खेळतील आणि त्यानंतर चार कसोटी आणि वनडे सामने खेळले जातील.
किंग्ज इलेव्हनच्या या वेगवान गोलंदाजाने पीटीआयला सांगितले की, “ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएल खेळत आहेत हे फार चांगले आहे. तोपर्यंत शरीर व गोलंदाजीत सुधारणा होईल.”
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने प्रथमच ऑस्ट्रेलियात 2018 मध्ये जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम गाजवला. त्यावेळी चेंडू छेडछाड प्रकरणामुळे यजमानांनी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला संघातून वगळले होते.
पण आता या दोघांच्या उपस्थितीमुळे मालिका आणखी रोमांचक होईल आणि सर्वांचे लक्षही या दौऱ्यावर असल्याचे शमी म्हणाला.
तो म्हणाला, “एका मोठ्या मालिकेपूर्वी आम्ही आयपीएल खेळत आहोत हे मला चांगले वाटत आहे. आयपीएल व्यतिरिक्त प्रत्येकाने त्या दौर्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या मालिकेबाबत बरीच चर्चा आहे. आमच्यात चांगली स्पर्धा होईल.”
यंदा आयपीएल युएईमध्ये अबूधाबी, दुबई आणि शारजाह या तीन ठिकाणी 53 दिवसांमध्ये 60 सामने होणार आहेत.
शमीला ही आयपीएल स्पर्धा भारतात खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेपेक्षा वेगळी वाटत आहे कारण भारतात संपूर्ण देशभर फिरावं लागत असे. यूएईमध्ये तस होणार नाही.
पुढे बोलताना तो म्हणाला, “हो भारतात एकामागून एक सामने, त्यामुळे डोकेदुखी होते. परंतु हे एक लहान स्वरूप आहे, लहान सामने आहेत. शारीरिकदृष्ट्या कामाच्या दडपणाने कोणतीही समस्या उद्भवणार नाही. यावेळी, जास्त प्रवास होणार नाही. आपल्याला बसमधून सुमारे दोन तास प्रवास करावे लागणार आहे (जेव्हा अबू धाबीमध्ये सामना असेल).”