इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) २०२२च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी राजस्थानला अक्षरश: धूळ चारली आहे. पहिल्या डावाच्या अखेरीस राजस्थानने ९ विकेट्स गमावत १३० धावा केल्या आहेत. यावेळी गुजरातच्या गोलंदाजांमध्ये हार्दिक पंड्याने सर्वाधिक ३, साई किशोरने २ आणि मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खान यांनी प्रत्येक एक विकेट्स घेतल्या. यावेळी डावाच्या शेवटच्या चेंडूवर रियान परागला शमीने त्रिफळाचित केले. मात्र, ही विकेट घेतल्यावर शमीच्या नावे एका विक्रमाची नोंद झाली आहे.
शमीने आयपीएल २०२२च्या चौथ्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर केएल राहुल याला बाद केले होते. तो सामना गुजरात टायटन्स संघाचा आयपीएल २०२२ मधील पहिला सामना होता. त्यानंतर आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्या गुजरातकडून शेवटचे षटक देखील मोहम्मद शमीने टाकले. यावेळी शेवटच्या चेंडूवर रियान परागला त्रिफळाचित केले. त्यामुळे आयपीएलच्या एका हंगामात आपल्या संघासाठी पहिल्या आणि शेवटच्या चेंडूवर विकेट घेण्याचा विक्रम शमीने केला आहे.
शमीची आयपीएल २०२२ मधील पहिल्या चेंडूवरील विकेट पाहण्यासाठी क्लिक करा
दरम्यान, राजस्थानने पहिल्या डावाच्या अखेरीस गुजरातला जिंकण्यायाठी १३१ धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात संघर्षपूर्ण झाली होती. पण नंतर शुमबन गिल आणि हार्दिक पंड्या यांच्या अर्धशतकी भागीदारीने संघाला सावरले आणि विजयाच्या दिशेने नेले. गुजरातने नंतर १८.१ षटकात ३ विकेट्स गमावत १३१ धावांचे लक्ष्य पार केले आणि विजेतेपदाला गवसणी घातली.
शामीची आयपीएल २०२२ मधील शेवटच्या चेंडूवरील विकेट पाहम्यासाठी क्लिक करा
विशेष गोष्ट अशी की गुजरातचा हा पहिलाच आयपीएल हंगाम होता आणि पहिल्याच हंगामात त्यांनी थेट विजेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे त्यांनी राजस्थान रॉयल्सच्या विक्रमाची बरोबरी केली. राजस्थानने पहिल्या आयपीएल हंगामात २००८ साली शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते.
व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
फक्त पंड्या अन् ‘या’ भारतीय कर्णधाराला जमलाय IPL Finalमध्ये विकेट घेण्याची किमया, वाचा सविस्तर
आयपीएल फायनल Live : कर्णधार हार्दिकची शानदार गोलंदाजी, राजस्थानचे गुजरातला १३१ धावांचे आव्हान
जिंकलस रे भावा! बटलरने गाजवला IPL 2022चा हंगाम, सर्वाधिक धावा करत मोडला वॉर्नरचा भलामोठा विक्रम