सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खैळली जात आहे. त्यातील दोन्ही सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. भारताने 12 वर्षांनंतर घरच्या भूमीवर कसोटी मालिका गमावली. तत्पूर्वी नुकताच बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीसाठी (Border Gavaskar Trophy) भारतीय संघ घोषित करण्यात आला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने भारतीय संघाबाबत मोठे वक्तव्य केले असून या मालिकेत त्यांना सामना जिंकणाऱ्या खेळाडूची उणीव भासणार असल्याचे म्हटले आहे.
पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताच्या विजयात शमीची महत्त्वाची भूमिका होती. घोट्याच्या दुखापतीमुळे तो गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलनंतर सामना खेळला नाही. त्याच्यावर उपचार देखील करण्यात आले. यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये होता.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना टेड मॅकडोनाल्ड (Ted McDonald) म्हणाले, “मोहम्मद शमीची अनुपस्थिती भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. आमचे फलंदाज ज्या पद्धतीने त्याची आवड, त्याची लाईन आणि लेन्थ आणि त्याच्या कामाबद्दलचे समर्पण याबद्दल बोलतात. हे लक्षात घेता भारताला नक्कीच त्याची उणीव भासेल.”
पुढे बोलताना मॅकडोनाल्ड म्हणाले, “गेल्या वेळी काय झाले ते आम्हाला माहीत आहे. त्यांच्या राखीव खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांच्या खेळाडूंना अजिबात कमी लेखता येणार नाही.” आपल्या संघ निवडीबद्दल बोलताना मॅकडोनाल्ड म्हणाले की, “आम्ही आमचा सर्वोत्तम संघ निवडू आणि त्यामध्ये कोणत्याही युवा खेळाडूचा समावेश केला तर आम्ही त्या दिशेने वाटचाल करू. निवडकर्त्यांना तो सर्वोत्तम पर्याय वाटत असेल तर आम्ही त्याला संधी देऊ.”
बाॅर्डर गावसकर ट्राॅफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
बॉर्डर गावसकर मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ कारणांमुळे मोहम्मद रिझवानला मिळालं पाकिस्तान संघाचं कर्णधारपद
पाकिस्तानला मिळाला नवा कर्णधार! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पीसीबीची मोठी घोषणा
39 वर्षीय खेळाडूचा जलवा, बनला रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू!