भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेल्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीत भारताला तिसर्या दिवशीच लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या धक्क्यातून भारतीय संघ सावरत असतानाच आणखी एक वाईट बातमी पुढे आली. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हाताला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला. त्यामुळे भारताची वेगवान गोलंदाजी फळी कमकुवत झाली आहे. अशात शमीची पत्नी हसीन जहाँ एका क्रिकेटपटूसोबत पार्टीचा आनंद लुटताना दिसली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले आहे.
इरफान पठानच्या मुलाच्या वाढदिवसाला लावली हजेरी
नुकतेच हसीन जहाँने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये ती माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठान आणि त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत असल्याचे दिसत आहे. १९ डिसेंबर रोजी इरफानचा मुलगा इमरान खान पठान याचा वाढदिवस असतो. या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये हसीन जहाँ सहभागी झाल्याचे दिसत आहे.
तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये इरफान आणि त्याची पत्नी सफा बेग यांनी कोरोना संक्रमणापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क घातल्याचे दिसत आहे. परंतु हसीन जहाँ मास्क न घालताच उभी असल्याचे दिसत आहे. सोबतच तिने या पोस्टला, “इरफानच्या मुलाच्या वाढदिवसाचे काही अविस्मरणीय क्षण” असे कॅप्शन दिले आहे.
नेटकऱ्यांनी हसीन जहाँच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही वापरकर्त्यांनी “एकीकडे पती दुखापतीने त्रस्त आहे आणि दुसरीकडे पत्नी वाढदिवसानिमित्त आयोजण्यात आलेल्या पार्टीचा आनंद लुटत आहे,” अशी टीका केली आहे.
https://www.instagram.com/p/CI_bmHqAxAl/?utm_source=ig_web_button_share_sheet
लग्नाच्या चार वर्षांच्या आतच सोडचिठ्ठी
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ हे २०१४ साली लग्नबंधनात अडकले होते. परंतु आपापसातील मतभेदांमुळे २०१८ साली त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. याच कारणामुळे सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. तिने शमीवर गंभीर आरोप लावले होते. तेव्हापासून हे दांपत्य वेगवेगळे राहत आहेत. त्यांना एक मुलगी देखील आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघाला मोठा धक्का, मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर
‘मोहम्मद शमी मालिकेबाहेर, ‘या’ गोलंदाजाला विनाविलंब ऑस्ट्रेलियाला पाठवा’, गावसकरांची आग्रही मागणी
मोहम्मद शमीच्या दुखापतीबाबत विराटने दिली माहिती, म्हणाला…