सेंच्युरीयनच्या मैदानावर (Centurion) दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात आतापर्यंत उभय संघातील खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी (२६ डिसेंबर) भारतीय फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली, तर तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या १९७ धावांवर संपुष्टात आणला. दरम्यान या डावात १ गडी बाद करणाऱ्या मोहम्मद सिराजने आगळे वेगळे सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.(south africa vs India first test)
मोहम्मद सिराजने पहिल्या डावात गोलंदाजी करताना रासी वान दर डुसेनला बाद करत माघारी धाडले होते. त्याने १३ व्या षटकातील ५ व्या चेंडूवर त्याला रहाणेच्या हातून झेलबाद करत माघारी पाठवले. त्याला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजने प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. क्रिस्टियानो रोनाल्डो जेव्हा गोल करतो त्यावेळी तो ३६० डिग्री फिरून हटके सेलिब्रेशन करतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने उभारला ३२७ धावांचा डोंगर
भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३२७ धावांचा डोंगर उभारला होता. भारतीय सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. ज्यामध्ये केएल राहुलने सर्वाधिक १२३ धावांची खेळी केली. तर मयांक अगरवालने ६० धावांचे योगदान दिले. तसेच अजिंक्य रहाणे देखील या सामन्यात फॉर्ममध्ये परतल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्याने ४८ धावांचे बहुमूल्य योगदान दिले.(Mohammad Siraj Cristiano Ronaldo style celebration)
The 𝗦𝗜𝗜𝗜𝗨𝗨𝗨𝗨 celebration has reached the @BCCI camp in South Africa 😅 pic.twitter.com/VLELTNhPbM
— Premier League India (@PLforIndia) December 28, 2021
https://twitter.com/Atharv7i/status/1475794034069159942?t=rCdjiWzil8P8pDodsbWPTg&s=19
दक्षिण आफ्रिकेचा डाव १९७ धावांवर संपुष्टात
या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला अवघ्या २९८ धावा करण्यात यश आले होते. दक्षिण आफ्रिका संघाकडून टेंबा बावूमाने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. तर क्विंटन डी कॉकने ३४ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, मोहम्मद शमीने सर्वाधिक ५ गडी, तर शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.
महत्वाच्या बातम्या :
“आपण ऑस्ट्रेलियाच्या आसपासही नाही”; संघसहकाऱ्याचीच इंग्लंड संघावर जहरी टीका
शाहिद कपूर म्हणतोय, “या’ दोघांना पाहून जर्सी सिनेमा करण्याची प्रेरणा मिळाली”
हे नक्की पाहा :