मोहम्मद सिराज आशिया चषक 2023च्या अंतिम सामन्यात मॅच विनर ठरला. त्याने 7 षटकात 21 धावा खर्च करून सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. सिराजच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने 10 विकेट्सने विजय मिळवला आणि त्याला सामनावीर पुरस्कार देखील दिला गेला. सामना संपल्यानंतर देखील रिसाजने एक असे काम केले, ज्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
आशिया चषक 2023 भारताच्या आग्रहामुळे हायब्रिड मॉडेलवर आयोजित केला गेला. या मॉडेलनुसार भारताचे सर्व सामने यजमान पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार नव्हते. हे सर्व सामने श्रीलंकेत हलवले गेले. पण श्रीलंकेतील वातावरण आशिया चषकाच्या दृष्टीने प्रतिकूल पाहायला मिळाले. अनेक सामन्यांमध्ये पावसने व्यत्यय आणला, तर काही सामने रद्द देखील करावे लागले. पण या सगळ्यात श्रीलंकेतील ग्राऊंड स्टाफने घेतलेली मेहनत विसरता येणार नाही.
मोहम्मद सिराज याने आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर भारताला विजय मिळवून दिलाच. पण सामना जिंकल्यानंतर वेगवान गोलंदाज ग्राऊंड स्टाफने घेतलेली मेहनत देखील विसरला नाही. अंतिम सामन्यात सामनापीर ठरल्यामुळे त्याला पाच हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले होते. पण वेगवान गोलंदाजाने मनाचा मोठेपणा दाखवून हे बक्षीस ग्राऊंड स्टाफला देण्याचा निर्णय घेतला. हा उदारपणा दाखवल्यामुळे सिराजचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Siraj dedicates his Player Of The Match award and cash prize to the Sri Lankan groundstaff ????❤️#AsiaCupFinal #AsianCup2023 #Siraj #INDvSL #IndiavsSrilanka #AsiaCupFinals #INDvsSLpic.twitter.com/b6pN1obGmk
— X (@MSDADDIC) September 17, 2023
Mohammad Siraj dedicates his Player Of The Match award and cash prize to the Sri Lankan ground staff.
This noble human made Indian squad win match with his terrific balling & is now winning hearts with kind gesture.
Take a bow @mdsirajofficial#Siraj #INDvSL #INDvsSL… pic.twitter.com/i6bpNsW2ne
— Pranay Ajmera (@pranaysajmera) September 17, 2023
(Mohammad Siraj donated the man-of-the-match prize money for the ground staff)
आशिया चषक फायनलसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका – पथुम निसांका, कुशल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दसून शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना.
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषक जिंकल्यानंतर ईशान किशनने का मानले रोहितचे आभार! समोर आले खास कारण
पंगा घेणाऱ्या श्रीलंकेला भारताने दाखवला इंगा! अखेर 24 वर्षांनंतर घेतला बदला, 1999मध्ये लंकेने काय केलेलं?