भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. हा सामना साउथॅम्प्टनच्या द रोज बाउल स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यातील पहिला आणि चौथा दिवस पूर्णपणे पावसामुळे रद्द करण्यात आला. सामन्यातील दुसरा दिवस भारतीय संघाच्या नावावर राहिला होता. तर तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघातील गोलंदाजांनी भारतीय संघाचा डाव २१७ धावांवर संपुष्टात आणला. त्यामुळे न्यूझीलंड संघ सध्या मजबूत स्थितीत आहे.
तसेच या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला स्थान देण्यात आले नाहीये. तरीदेखील तो सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसून येत आहे.
मोहम्मद सिराजची गेल्या काही सामन्यांतील कामगिरी पाहता त्याला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या अनुभवी वेगवान गोलंदाजांची तिकडी असल्यामुळे तो प्लेइंग इलेव्हनमध्ये आपले स्थान निश्चित करू शकला नाही.
अशातच लाईव्ह सामन्यातील पव्हेलियनमध्ये बसलेला त्याचा एक फोटो सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो वॉकी टॉकीवर बोलताना दिसून येत आहे. हा फोटो विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा आहे. ज्यावेळी न्यूझीलंड संघ फलंदाजी करत होता. तसेच मोहम्मद सिराजच्या या फोटोचे अनेक मिम्स बनवून देखील व्हायरल केले जात आहेत.(Mohammad siraj hilarious memes went viral on social media)
भन्नाट मिम्स होत आहेत व्हायरल
एका युजरने मोहम्मद सिराजचा फोटो रवी शास्त्री यांच्यासोबत जोडला आहे. त्या फोटोमध्ये रवी शास्त्री झोपलेले दिसून येत आहेत. यावर त्या युजरने कॅप्शन म्हणून लिहिले आहे की, “ओए कोच उठा.. २०० धावा करणारा फलंदाज बाद झाला आहे. वाचलो आपण.”
'Oye coach ko uthao oye.. Out ho gaya 200 vala.. bach gaye' pic.twitter.com/QnK2eva3vq
— Kanav Bali🏏 (@Concussion__Sub) June 20, 2021
तर दुसऱ्या एका फोटोवर मजेशीर कॅप्शन देत लिहण्यात आले आहे की, “एक प्लेट बिर्याणी तयार ठेवा दुपारच्या जेवणासाठी.”
Ek plate mutton biryani tayyar rakho lunch k liye. pic.twitter.com/cWwIlNrF7h
— T (@its_tabrez__) June 20, 2021
तसेच आणखी एका फोटोमध्ये रवी शास्त्री देखील कॉल वर बोलताना दिसून येत आहेत. ज्यावर युजरने कॅप्शन म्हणून लिहिले की, “अल्फा टू डेल्टा: सोडा आणि चखण्याचा बंदोबस्त झाला आहे, ओवर.”
https://twitter.com/Manu_k333/status/1406653486683492359?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1406653486683492359%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fmohammed-siraj-viral-photo-on-walkie-talkie-fans-trolled-ravi-shastri-78399
Kohli: can you call Grandhomme
Siraj: Colin Grandhomme pic.twitter.com/4bY7jdVWAD
— Sir Yuzvendra (parody) (@SirYuzvendra) June 20, 2021
अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचे म्हणणे आहे की, मोहम्मद सिराजला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळायला हवी होती. कारण सिराजला या खेळपट्टीवर चेंडू स्विंग करण्यास यश आले असते.
महत्वाच्या बातम्या-
एकही चेंडू न टाकता चौथ्या दिवसाचा खेळ रद्द, आजही असेल का पावसाचं सावट? घ्या जाणून
WTC फायनल: पावसामुळे २ दिवस वाया गेल्यानंतर आयसीसीकडून दर्शकांना ‘मोठा दिलासा’