---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सचा ‘विभीषण’! सिराजला महत्त्वाचा मंत्र सांगितला अन् बेंगलोरने ‘रॉयल’ विजय मिळवला

On: बुधवार, एप्रिल 28, 2021 3:41 PM
---Advertisement---

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात बेंगलोर संघाने १ धावाने विजय मिळवला होता. या सामन्यात रिषभ पंत आणि शिमरॉन हेटमायर यांनी तुफान फटकेबाजी करून सुद्धा दिल्ली संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की, दिल्ली संघ पराभूत होण्यामागे दिल्ली संघातील दिग्गज खेळाडूचा मोठा हात आहे. याबाबतचा खुलासा बेंगलोर संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराद याने केला आहे.

मोहम्मद सिराजने शेवटच्या षटकात धारदार गोलंदाजी केली होती. शेवटच्या चेंडूवर जेव्हा ६ धावांची आवश्यकता होती तेव्हा रिषभ पंतने चौकार मारला होता. हा सामना जिंकल्यानंतर मोहम्मद सिराजने सांगितले होते की, कशाप्रकारे दिल्ली कॅपिटल्स संघाच्या गोलंदाजाने त्याला सामना जिंकवण्यात मदत केली होती?

तो म्हणाला की, “शेवटच्या षटकात कशी गोलंदाजी करायची हे मला आता कळाले आहे. हे समजeवुन सांगण्यात मला ईशांत भाई म्हणजेच ईशांत शर्माने खूप मदत केली आहे. तसेच ईशांत भाईसोबत जसप्रीत भाईनेही मला खूप मदत केली आहे.”

लक्षवेधी बाब अशी ठरली की, ईशांत शर्माने दिलेला सल्ला सिराजने त्याच्याच संघाविरुद्ध अमलात आणला आहे. सिराजला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने या दौऱ्यावर सर्वाधिक गडी बाद केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत तो बेंगलोर संघासाठी मोलाची भूमिका बजावताना दिसत आहे.

या सामन्यात दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बेंगलोर संघाकडून एबी डिविलियर्सने सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली. तर रजत पाटीदारने ३१ धावा केल्या होत्या. यासोबतच ग्लेन मॅक्सवेलने २५ धावांचे योगदान दिले होते. बेंगलोर संघाला २० षटक अखेर १७१ धावांचा डोंगर उभारण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करताना रिषभ पंतने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली तर शिमरॉन हेटमायरने ५३ धावांची तुफानी अर्धशतकी खेळी केली होती. शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी ६ धावांची आवश्यकता असताना रिषभ पंतने चौकार मारला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने हा सामना १ धावाने आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या-

CSKvSRH: धोनी पुन्हा गाठणार अव्वलस्थान की वॉर्नर मिटवणार लुजरचा टॅग; पाहा कोणाचे पारडे आहे जड?

आयपीएलमधून माघार घेतलेल्या झम्पाचे धक्कादायक वक्तव्य; म्हणे, ‘भारतातील वातावरण सुरक्षित वाटत नव्हतं’

‘भारत देश माझं दुसरं घर आहे, नागरिकांना तडफडताना पाहू शकत नाही,’ भारतीयांना मदत करण्यासाठी समोर आलाय ब्रेट ली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---