---Advertisement---

जखमी असूनही एका फोन कॉलवर विराट पोहोचला होता सिराजच्या घरी, गोलंदाजाकडून भावुक किस्स्याला उजाळा

On: शुक्रवार, फेब्रुवारी 18, 2022 11:51 PM
Mohammad-Siraj-Family-And-ViratKohli
---Advertisement---

भारताचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर म्हणजे आरसीबीचा (RCB) वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने(mohammad siraj) विराट कोहलीच्या(virat kohali) नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये पदार्पण केले. यासोबतच त्याचे आंतरराष्ट्रीय कसोटीत पदार्पणही विराट कोहलीसोबत झाले. आरसीबी पॉडकास्टवर बोलताना सिराजने विराटशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या. त्यामध्ये विराट कोहलीची त्याच्या घरी भेट देणे हे त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम आश्चर्य होते असं त्याने म्हटलं आहे.

आरसीबी पॉडकास्टवर त्याच्या आयुष्यातील काही किस्से शेअर करताना मोहम्मद सिराज म्हणाला, “मी आरसीबीमधील सर्वांना माझ्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते. हॉटेलमधून घरी गेल्यावर मी विराट भैय्याला फोन केला, पण तो म्हणाला की त्याच्या पाठीत दुखत असल्याने तो जेवायला येणार नाही. मी त्याला विश्रांती घेण्यास सांगितले, मी आणखी काय बोलू शकत नव्हतो”.

सिराज पुढे म्हणाला, “जेव्हा सर्वजण आले. तेव्हा मी विराट भैय्याला गाडीतून खाली उतरताना पाहिले. तेव्हा सगळेच आले होते. पार्थिव भाई, चहल आणि बाकी सगळेच. पण मी धावतच विराट भैय्याकडे गेलो आणि त्याला मिठी मारली. ते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे आश्चर्य होते.”

पुढे सिराजने सांगितले, “मला फक्त संघर्ष करावा लागला, माझे वडील ऑटो चालवत होते. माझ्याकडे फक्त प्लॅटिना मोटरसायकल होती. वडील मला पेट्रोलसाठी ६० रुपये द्यायचे. माझ्या घरापासून लांब असलेल्या उप्पल स्टेडियमपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रबंधन करायचो. जेव्हा माझी आयपीएलसाठी निवड झाली, तेव्हा माझा सर्व संघर्ष संपला. वडिलांनी ऑटो चालवणे बंद केले. आईने लोकांच्या घरची कामे करणे बंद केले. आम्ही भाड्याच्या घरात राहणे देखील बंद केले. आम्ही नवीन घर घेतले. आयुष्यात मला इतर कशाचीही गरज नव्हती. आयपीएलने मला प्रसिद्धी दिली.”

https://www.instagram.com/p/BieV8fHjuUJ/?utm_source=ig_web_copy_link

आयपीएल २०२२ साठी आरसीबीने कायम ठेवलेल्या तीन खेळाडूंमध्ये सिराजसह विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूचा समावेश आहे. आरसीबीने भारतीय अष्टपैलू हर्षल पटेलला १०.७५ कोटी रुपयांत विकत घेतले आहे. तसेच आरसीबीने श्रीलंकेचा गोलंदाज वानिंदू हसरंगाला १०.७५ कोटी, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड ७.७५ कोटी, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फॅफ डू प्लेसिस ७ कोटी तर भारताचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक ५.५ कोटी, यष्टीरक्षक-फलंदाज अनुज रावत ३.४ कोटी, शाहबाज अहमद २.४ कोटी रुपये देऊन यांचाही संघात समावेश केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलमध्ये दुर्लक्षित राहिलेल्या श्रीसंतचे ९ वर्षांनंतर प्रथम श्रेणीत कमबॅक, पहिल्याच सामन्यात केली कमाल

दुसऱ्या टी२०पूर्वी विंडीजचे खेळाडू आणि पंच मैदानावर बसले गुडघे टेकून, पण भारतीय खेळाडू मात्र…

गडी भलताच खुश! लाजवाब अर्धशतकानंतर विराट बोलला मोठी गोष्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---