सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा एकही बळी मिळवू शकला नाही. त्यामुळे आता त्याला जागतिक वनडे गोलंदाजी क्रमवारीत त्याचे नुकसान सहन करावे लागेल. मंगळवारी (22 मार्च) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या नव्या गोलंदाजी क्रमवारीत त्याची पहिल्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. या मालिकेसाठी उपलब्ध नसतानाही ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
https://www.icc-cricket.com/media-releases/3118656
सिराज हा मागील दोन महिन्यांपासून वनडे गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. मुंबई येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने तीन बळी मिळवलेले. मात्र, दुसऱ्या सामन्यात 3 षटकात 37 धावा देऊन देखील त्याला एकही बळी मिळाला नाही. याचेच नुकसान त्याला या क्रमवारीत झाले.
नव्या गोलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट दिसून येतो. विशेष म्हणजे हे दोन्ही गोलंदाज सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाहीत. भारताविरुद्ध पहिल्या दोन वनडेत 8 बळी मिळवणारा ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा सिराजसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान हा देखील अव्वल पाचमध्ये दिसून येतो.
सिराज व्यतिरिक्त इतर कोणताच भारतीय गोलंदाज पहिल्या 20 मध्ये नाही. कुलदीप यादव 24, जसप्रीत बुमराह 26 व मोहम्मद शमी 28 व्या स्थानी काबीज आहेत. फलंदाजांच्या वनडे क्रमवारीत शुबमन गिल पाचव्या, विराट कोहली आठव्या व रोहित शर्मा नवव्या क्रमांकावर आहे.
(Mohammad Siraj Slips From Number One Ranking Of ODI Bowling Ranking Josh Hazlewood Tops)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे विश्वचषक 2023चं वेळापत्रक आलं रे, ‘या’ दिवशी खेळला जाणार अंतिम सामना?
वनडेत अपयशी ठरत असलेल्या सूर्याच्या खांद्यावर ठेवला कोच द्रविडने हात! म्हणाला, “त्याच्यात गुणवत्ता असून…”