---Advertisement---

सिराजकडे ‘त्या’ प्रकारचा चेंडू टाकण्याची नैसर्गिक शैली आहे, सचिन तेंडुलकरने केली पाठराखण

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून मोहम्मद सिराजने खूप प्रभावशाली गोलंदाजी केली. ज्यामध्ये त्याने गोलंदाजी करताना इन-कटर चेंडू फेकले होते . मात्र काही लोकांचा दावा आहे की, धावपट्टीवर निर्माण झालेल्या भेगामुळे त्याने इन-कटर चेंडू फेकले. यावर आता भारतीय संघाचे महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय संघाचे महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांनी लोकांनी केलेल्या दाव्याचे खंडन केले आहे. ज्यामध्ये काही लोकांचा असा दावा होता की, मोहम्मद सिराजने चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या दिवशी ज्या प्रकारे शानदार इन-कटर चेंडू फेकले, ते धावपट्टीवर निर्माण झालेल्या भेगामुळे शक्य झाले. त्यावर सचिन तेंडुलकर यांनी आपली प्रतिक्रीया मांडली आहे की, सिराजमध्ये इन-कटर चेंडू फेकण्याची स्वाभाविक क्षमता आहे. त्यामुळे धावपट्टीवर निर्माण झालेल्या भेगामुळे तो इन-कटर चेंडू फेकू शकला म्हणने चूकीचे आहे.

आपल्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत सचिन तेंडुलकर म्हणाले, “जेव्हा सिराज गोलंदाजी करत होता, तेव्हा मी काही लोकं म्हणत असताना ऐकले की, तो धावपट्टीवर निर्माण झालेल्या भेगाचा फायदा घेऊन इन-कटर चेंडू फेकत आहे. परंतू मी जे पाहिले ते पूर्णपणे वेगळे होते. तो आउट स्विंगर फेकत होता. सीम पहिल्या स्लिपमध्ये जात होती, आणि कधी कधी दुसर्‍या स्लिपकडे जात होता. ”

सचिन तेंडुलकर 26 वर्षीय मोहम्मद सिराजबद्दल बोलताना म्हणाले,” मी पाहिले की, तो जेव्हा इन-कटर चेंडू टाकत होता, तेव्हा त्याच्या बोटांची हालचाल बदलून जाते. ती क्रॉस सीम होवून जाते. अशात मी नाही मानत की, धावपट्टीवर निर्माण झालेल्या भेगामुळे त्याचा चेंडू इन-कटर होत आहे. त्याच्यामध्ये अगोदर पासून नैसर्गिक इन-कटर चेंडू टाकण्याची क्षमता आहे. ”

ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव 111.4 षटकांत सर्वबाद 336 धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने आपला दुसरा डाव खेळायला सुरुवात केली आहे. त्यांनी तिसरा दिवसाखेर 6 षटके खेळत बिनबाद 21 धावा केल्या आहेत. यामध्ये सलामी फलंदाज डेविड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस हे अनुक्रमे 20 आणि 1 धावावर नाबाद आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

किंग्स इलेव्हन पंजाबचा ‘हा’ क्रिकेटर बनला बाबा, झाली पुत्ररत्न प्राप्ती

खराब शॉट खेळून बाद झाल्याने रोहितवर भडकला ‘हा’ माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू

पहिल्याच कसोटी सामन्यात बॅटिंग- बॉलिंगमध्ये ‘सुपर’ कामगिरी करणारे भारतीय, ‘ही’ आहेत नावे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---