---Advertisement---

सामना सूर्याने गाजवला पण ड्रेसिंग रूमचा ‘किंग’ ठरला दुसराच! जाणून घ्या नक्की कोणाला मिळाले हे खास मेडल?

On: रविवार, फेब्रुवारी 8, 2026 9:34 PM
---Advertisement---

टी-20 विश्वचषक 2026 (T-20 World Cup 2026) मध्ये गतविजेता भारतीय संघाने विजयाने सुरुवात केली असली, तरी फलंदाजांची कामगिरी चाहत्यांच्या अपेक्षेनुसार झाली नाही. अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. मात्र, गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. सूर्याला त्याच्या नाबाद 84 धावांच्या खेळीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ मिळाले, पण टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये दिला जाणारा खास ‘इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द मॅच’ मेडल मात्र मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj) पटकावले.

मोहम्मद सिराजचा सुरुवातीला विश्वचषकाच्या मुख्य संघात समावेश नव्हता. पण 6 फेब्रुवारीला हर्षित राणा दुखापतग्रस्त झाल्यामुळे सिराजला तातडीने संघात बोलावण्यात आले. 7 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने 4 षटकांत केवळ 29 धावा देत 3 बळी घेतले. त्याच्या या अचूक गोलंदाजीमुळे आणि चपळ क्षेत्ररक्षणामुळे त्याला ड्रेसिंग रूममध्ये खास मेडल देऊन गौरवण्यात आले. बीसीसीआयने याचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सामन्यानंतर सिराजने आपल्या अचानक झालेल्या निवडीबद्दल एक रंजक खुलासा केला. तो म्हणाला, “हे सर्व देवाच्या नियोजनाप्रमाणे झाले आहे. मी सुट्टीसाठी स्पेनला जायला निघालो होतो आणि विमानाचे तिकीटही तयार होते. पण त्याच वेळी सूर्या भाईचा फोन आला आणि त्यांनी मला लगेच संघात सामील होण्यास सांगितले. त्यामुळे मी स्पेनचा बेत रद्द केला आणि थेट मुंबई गाठली.

मोहम्मद सिराज 2024 च्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचाही भाग होता आणि त्या स्पर्धेतही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---