पाकिस्तान क्रिकेट संघाने रविवार (4 सप्टेंबर) गाजवला. सध्या संयुक्त अमिराती येथे आशिया चषक स्पर्धेचा 15वा हंगाम खेळला जात आहे. तर पाकिस्तानने सुपर फोरमध्ये भारताचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयाबरोबरच त्यांनी 28 ऑगस्टला मिळालेल्या पराभवाचा वचपा काढला. या विजयाचा नायक ठरला विकेटकिपर-फलंदाज मोहम्मद रिजवान. त्याने सलामीला येत संघ संकटात असताना अप्रतिम कामगिरी केली. मैदानात त्याने त्याचा बेधडकपणा दाखवला असला तरी तो मैदानाबाहेर त्याच्या विरुद्ध आहे.
पाकिस्तानाचा स्टार फलंदाज मोहम्मद रिजवान हा त्याच्या जबरदस्त खेळीसाठी ओळखला जातो, मात्र तो मैदानाबाहेर लाजाळू स्वभावाचा आहे. विशेष म्हणजे तेव्हा एखादी मुलगी समोर आली की तो त्यापासून लांबच राहणे पसंत करतो. त्याने भारताविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी मोहम्मद नवाजच्या साथीने 73 धावांची खेळी केली. तर रिजवानने 51 चेंडूत 71 धावा केल्या. या तुफानी खेळीमध्ये त्याने चार चौकार आणि दोन षटकार फटकारले आहेत.
मुलींपासून दूर पळतो रिजवान
सध्या यूट्यूबवर रिवानचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक भारतीय चाहतीला त्याच्यासोबत सेल्फी काढायचा होता. रिजवान फोटो तर काढू देतो मात्र खूप अंतर ठेवूनच. त्या मुलीने पाक टिव्ही डॉट टिव्ही चॅनलला सांगितले की, तिने रिजवानला सेल्फी काढण्याचे विचारले. पहिले तर रिजवानने म्हटले येतो, तो आलाही आणि खूप लांब उभे राहून फोटो काढला.
तसेच त्या मुलीने आपल्या सोबत असलेल्या मुलीलाही फोटो काढण्यास बोलावले, कारण रिजवानने एकट्या मुलीसोबत फोटो काढला नसता. पुढे या व्हिडिओमध्ये जेव्हा एक मुलगा रिजवानसोबत फोटो काढण्यासाठी आला तर रिजवानने त्याच्या खांद्यावर हात ठेवत फोटो काढला. या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले, “मी महिलांना आणि मुलींना अधिक सन्मान देतो. त्यांचे स्थान माझ्या जीवनात खूप वरचे आहे.”
भारताविरुद्ध उत्तम खेळण्याची रिजवानची ही काही पहिलीच वेळ नाही. त्याने 2021च्या विश्वचषक सामन्यातही कर्णधार बाबर आझम सोबत मोठी भागीदारी रचत भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. त्या सामन्यात त्याने नाबाद अर्धशतकी खेळी केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“विराटने मेसेज न केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करावी” भारतीय दिग्गजाने सुरू केला नवा वाद
टीका होत असलेल्या अर्शदीपला शमीने दिला धीर; म्हणाला, “आपला देश…”
अर्शदीप सिंग | गोलंदाजाला समर्थन देण्यासाठी माजी दिग्गजाने थेट प्रोफाईल फोटोच बदलला