ICC CWC 2023 : मंगळवारी (10 ऑक्टोबर) झालेल्या पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यात पाकिस्तान संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान याने विजयी खेळी केली. त्याच्या अप्रतिम शतकानंतर माजी भारतीय खेळाडू आकाश चोप्रा याने मोठं वक्तव्य केलं आहे. आकाश चोप्रा म्हणाला, शेवटी असं वाटत होतं की, रिझवान एकाच पायावर खेळत आहे. त्याची ही खेळी जबरदस्त होती.
दरम्यान, रिझवान (Mohammad Rizwan) जेव्हा शतकाच्या जवळ येत होता तेव्हा त्याचे स्नायू खूप दुखत असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे त्याला फलंदाजी करणे अवघड होत असल्याचे दिसले. परंतु असं असतानाही त्याने हार मानली नाही. संघाला विजय मिळवून देण्यासाठी धावा काढताना तो सर्वकाही पणाला लावून पळत होता. रिझवानने 121 चेंडूत नाबाद 131 धावांची जबरदस्त खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
आपल्या यू-ट्युब चॅनेलवर बोलताना आकाश चोपरा (Aakash Chopra) रिझवानबद्दल म्हणाला, “344 धावांचा पाठलाग करणं शक्य नव्हतं परंतू त्यांनी ते करुन दाखवलं. हे त्यांनी तेव्हा केलं जेव्हा 37 धावसंख्येवर इमाम उल हक (Imam-Ul-Haq) आणि कर्णधार बाबर आझम बाद झाले होते. अब्दुल्ला शफीक (Abdullah Shafique) माझ्या आवडीचा खेळाडू आहे. त्याने आशिया चषकातही चांगली खेळी केली होती, आणि इथंही त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. तो बाद झाल्यानंतर मोहम्मद रिझवानने जबरदस्त खेळी केली. शेवटी रिझवान एकाच पायावर खेळत होता. तरीही त्याने शतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला.”
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ९ विकेट्स गमावून ३४४ धावसंख्या उभारली होती. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ३७ धावांवर पाकिस्तानने २ म्हत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. परंतु शफीक आणि ऱिझवान यांच्या भागीदारीने विजय आपल्या बाजूने खेचून आणला आणि ६ विकेट राखून सामना जिंकला. (Mohammed Rizwan on one leg only Big statement former Indian player after century)
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! एशियन गेम्समध्ये भारताला सुवर्ण पदक देण्यावर अफगाणी खेळाडूचा आक्षेप; म्हणाला…
आहा कडकच! बड्डे बॉय पंड्याने काढला विस्फोटक गुरबाजचा काटा, सीमारेषेवर शार्दुलचा अफलातून कॅच