---Advertisement---

सामन्यातील शेवटचे षटक टाकताना हा विचार करत होते शमी आणि शार्दुल ठाकूर

---Advertisement---

वेलिंग्टन । शुक्रवारी (31 जानेवारी) झालेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. हा सामना जिंकत भारताने मालिकेत 4-0 (Lead by 4-0) ने आघाडी घेतली. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध तिसरा सामनादेखील भारताने सुपर ओव्हरमध्येच जिंकला होता.

तिसऱ्या टी20मध्ये भारतीय संघाकडून 20 व्या षटकामध्ये मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि चौथ्या टी20मध्ये 20 व्या षटकात शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

चौथा सामना संपल्यानंतर भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) होस्ट करत असलेल्या ‘चहल टीव्ही’ (Chahal T.V.) या बीसीसीआयच्या (BCCI) एका शोमध्ये चहलने शमी आणि शार्दुलला त्यांच्या कामगिरीचे रहस्य विचारले.

https://twitter.com/BCCI/status/1223247222537474054

सर्वप्रथम चहलने शमीला विचारले की, तिसऱ्या सामन्याच्या अंतिम षटकात पराभूत होण्यापासून संघाचा बचाव करत सामना सुुपर ओव्हरपर्यंत नेला होता. तसेच चहलने विचारले की हॅमिल्टनमध्ये तुझ्या पहिल्या चेंडूवर षटकार मारण्यात आला होता. त्यानंतर 3 धावा करायच्या होत्या तेव्हा डोक्यात कोणती कल्पना चालू होती?

चहलच्या प्रश्नाचे उत्तर देताना शमी म्हणाला की, “माझ्या डोक्यात कोणताही कल्पना नव्हता. मी योजना आखली होती की एक यॉर्कर चेंडू टाकावा चेंडू हातातून निसटला. यानंतर माझ्याकडे काहीच शिल्लक नव्हते. मी विचार केला की, पुढच्या चेंडूवर धावा गेल्या तर बाऊंसर टाकता येईल.”

“यानंतर विलियम्सन बाद झाला आणि मला वाटले की आता शॉर्ट बॉल टाकणे योग्य ठरेल. यानंतर दोन चेंडू निर्धाव गेले. तेव्हा शेवटच्या चेंडूवर एकच पर्याय होता. तो म्हणजे चेंडू स्टंप्सवर फेकणे. कारण न्यूझीलंडचे खेळाडू कसेही करून एक धाव घेणारच होते,” असे शमी यावेळी म्हणाला.

यानंतर चहलने शार्दुलला प्रश्न विचारला की अंतिम षटकात तुझ्यावर किती दबाव होता?

यावर प्रत्युत्तर देताना शार्दुल म्हणाला की, “दबाव तर होताच परंतु मला पहिल्या चेंडूवर विकेट घ्यायची होती. कारण फलंदाज विचार करत असतो की पहिल्या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारून सामना संपवावा.  माझी अशी योजना होती की स्लोवर चेंडू टाकून मोठा शॉट खेळवावा आणि फलंदाजाने तेच केले. त्यामुळे तो बाद झाला. दुसऱ्या चेंडूवर जेव्हा चौकार गेला तेव्हा मी विचार केला की अशा प्रसंगी हे घडत राहते त्यामुळे तसे झाले तरीही आशा सोडायची नाही.”

चहलने नकल चेंडूचे रहस्य विचारले असता शार्दुल म्हणाला की, “आम्ही लहानपणापासूनच बोट वाकडे करून चेंडू टाकत आहे. तेच मी सामन्यात केले.”

हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी चहल प्रार्थना करत म्हणाला की, आता पाचवा सामना सुपर ओव्हरपर्यंत जाऊ नये.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---