भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना भारतीय संघाचा २०२० सालातील अखेरचा वनडे सामना होता. या सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खेळला नाही. मात्र, तरीही शमीने सलग दुसऱ्या वर्षी आपल्या नावावर एक खास विक्रम नोंदवला.
मोहम्मद शमी २०२० साली भारतीय संघाकडून वनडे सामन्यांत सर्वाधिक बळी मिळविणारा गोलंदाज ठरला. या वर्षात शमीने ६ वनडे सामन्यांत ३२.७५ च्या सरासरीने १२ बळी पटकाविले. विशेष म्हणजे २०१९ साली देखील वनडे सामन्यांत सर्वाधिक बळी घेणार्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद शमीच अव्वल स्थानावर होता.
कारकिर्दीत तिसर्यांदा मिळवले अव्वल स्थान
सन २०१३ साली भारताकडून पदार्पण केलेल्या मोहम्मद शमीने वनडे सामन्यांत सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. पदार्पणानंतरच्या पुढच्या वर्षीच मोहम्मद शमी त्या वर्षांतील वनडे सामन्यांत भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. हीच कामगिरी त्याने २०१९ साली तसेच २०२० साली देखील केली आहे.
गेली दोन वर्षे मोहम्मद शमी भारतासाठी हुकमी एक्का ठरला आहे.
एका वर्षात सर्वाधिक बळी मिळविणारे भारतीय गोलंदाज (२०१० पासून)
२०१०- आशिष नेहरा
२०११- मुनाफ पटेल
२०१२- इरफान पठाण
२०१३- रवींद्र जडेजा
२०१४- मोहम्मद शमी
२०१५- उमेश यादव
२०१६- जसप्रीत बुमराह
२०१७- जसप्रीत बुमराह
२०१८- कुलदीप यादव
२०१९- मोहम्मद शमी
२०२०- मोहम्मद शमी
ट्रेंडिंग लेख-
विराटच्या अनुपस्थित टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; उद्भवू शकतात ‘या’ तीन समस्या
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजीत कमावलं ते गोलंदाजीत गमावलं! जड्डू आता ‘त्या’ नकोशा विक्रमाच्या यादीत दुसर्या स्थानी