भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या संघातून बाहेर आहे. आगामी आशिया चषक आणि सध्या सुरू असलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मोहम्मद शमीला संधी दिली गेली नाहीये. असे असले तरी, संघातून बाहेर असताना त्याला मोकळा वेळ मिळाला आहे, ज्याचा तो पुरेपूर फायदा घेताना दिसतो. त्याने काही दिवसांपूर्वी नवीन जॅग्वार कार खरेदी केली होती, ज्याचा खास व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मोहम्मद शमी (Mohammed Shami) त्याच्या या नवीन चमकदार ‘जॅग्वार एफ टाईप’ कारची सवारी करताना व्हिडिओत दिसत आहे. त्याची ही कार लाल रंगाची आहे, ज्यावर अगदी कुणाचेही मन येऊ शकते. कारची किंमत १ कोटी रुपये आहे आणि २५० किमी ताशी गतीने धावू शकते. अवघ्या काही सेकंदात कार शून्य ते १०० किमी ताशी गती ही जॅग्वार पकडू शकते. यामध्ये २.० लीटरचे टर्बो पेट्रोल एंजीन आहे, जे २९५ बीएचपी एवढी ताकद देते. व्हिडिओत शमी स्वतः कार ड्राईक करताना दिसत आहे.
View this post on Instagram
शमी अजून एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला आहे. या व्हिडिओत शमी ही नवीन कार नेण्यासाठी शो रूममध्ये पोहोचल्याचे दिसते. व्हिडिओत तो गाडीला अनविल करत आहे. ही कार खरेदी करण्याच्या आही आठवड्यांपूर्वी त्याने रॉयल एनफिल्डची कॉन्टिनेंटल जीटी – ६५० बाईक देखील खरेदी केली होती. या बाईकची शोरूम किंमत ३.३० लाख रुपये आहे. यामध्ये ६४८ सीसीचे एंजीन आहे, जे ७१५० आरपीएमवर ४७ पीएसची ताकत तयार करते. शमीच्या कार कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू ५ सिरीज आणि एक ऑडी देखील आहे.
View this post on Instagram
दरम्यान, मोहम्मद शमी आयपीएल २०२२ नंतर भारतासाठी एकही टी-२० सामना खेळला नाहीये. मागच्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला निवडले गेले होते. पण त्यानंतर वेस्ट इंडीज, झिम्बाब्वे दौऱ्यातून तसेच आशिया चषकातून त्याला वगळले गेले. आगामी काळात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकात शमी भारतासाठी महत्वाचा गोलंदाज ठरू शकतो. मात्र, युवा खेळाडूंमुळे त्याला संधी मिळेलच, याची खात्री देता येणार नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
VIDEO। चालू सामन्यात असं काही घडलं की इशान किशनने थेट अक्षर पटेलच्या डोक्यात बॉल मारला
दु:खद! भारतीय फुटबॉलला ‘सुवर्ण युग’ दाखवणारा दिग्गज हरपला, ‘बद्रू दा’ यांचे निधन
दु:खद! भारतीय फुटबॉलला ‘सुवर्ण युग’ दाखवणारा दिग्गज हरपला, ‘बद्रू दा’ यांचे निधन