टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं जवळपास एका वर्षानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. शमीनं रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळताना मध्य प्रदेश विरुद्ध पहिल्या डावात 4 विकेट घेतल्या. शमीला सामन्याच्या पहिल्या दिवशी एकही विकेट मिळाली नव्हती. मात्र त्यानं दुसऱ्या दिवशी याची भरपाई केली.
बंगालनं पहिल्या डावात 228 धावा केल्या होत्या. याला उत्तर देताना मध्य प्रदेशनं चांगली सुरुवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी 103/1 स्कोर बनवला होता. ते पहिल्या डावात केवळ 91 धावांनी पिछाडीवर होते. मात्र दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात शमीच्या नेतृत्वाखाली बंगालच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केला आणि मध्य प्रदेशचा डाव 167 धावांवर गुंडाळला.
शमीनं मध्य प्रदेशचा कर्णधार शुभम शर्माला बोल्ड करत आपली पहिली विकेट घेतली. यानंतर त्यानं सारांश जैन आणि कुलवंज खेजरोलिया यांना बोल्ड केलं. शमीनं कुमार कार्तिकेयला विकेटमागे झेलबाद केलं. यष्टीरक्षक वृद्धिमान साहानं त्याचा झेल घेतला. शमीसह मोहम्मद कैफनं 2 बळी घेतले.
मोहम्मद शमीला 2023 विश्वचषक फायनलनंतर गुडघ्याची शस्त्रक्रिया करावी लागली होती. यामुळे तो बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिला. शमी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी फिट होईल, असं बोललं जात होतं. मात्र एनसीएमध्ये रिहाब दरम्यान त्याच्या गुडघ्यावर पुन्हा सूज आली. यामुळे त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नाही. आता त्यानं रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करून आपली फिटनेस सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे चांगली कामगिरी केल्यास त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होते का, हे पाहणं आता महत्त्वाचं असेल.
हेही वाचा –
3 दिग्गज फिरकीपटू जे आयपीएल 2025 मेगा लिलावात अनसोल्ड राहू शकतात
“देशासाठी शतक झळकावण्याचं माझं स्वप्न… “,सामना संपल्यानंतर तिलक वर्मा भावूक, या व्यक्तीला दिले श्रेय
IND VS SA; वरुण चक्रवर्तीने मोडला आर आश्विनचा मोठा रेकाॅर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच