भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणलं की चाहत्यांच्या भावनांचे हिंदोळे उचंबळून येतात. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मधील भारताची पहिली लढत त्यांचा पारंपारिक प्रतिद्वंद्वी पाकिस्तान यांच्यासोबतच झाली होती. या सामन्यात बाबर आझम आणि संघाने मिळून भारतावर १० विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अत्यंत निराशाजनक प्रदर्शन केले. त्यातही अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा अतिशय महागडा गोलंदाज सिद्ध झाला.
त्याच्या या निराशादायी प्रदर्शनाबरोबरच संघातील एकमेव मुस्लिम धर्मीय खेळाडू म्हणून काहींनी त्याच्यावर पातळी सोडून टीका केली. यानंतर अगदी सचिन तेंडूलकरपासून ते गौतम गंभीरपर्यंतच्या क्रिकेटपटूंनी त्याच्या पाठीशी उभे राहत टीकाकारांना तिखट प्रत्युत्तरे दिली. या प्रकरणानंतर आता पहिल्यांदाच शमीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
आपल्यावर झालेल्या टिकेकडे दुर्लक्ष करत शमीने सरावावर लक्ष केंद्रित करण्याला प्राधान्य दिले असल्याचे त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरुन दिसते आहे. त्याने दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सरावासाठी परतले असतानाचा फोटो शेअर केला आहे. तो या फोटोमध्ये जसप्रीत बुमराहसोबत चर्चा करताना दिसतो आहे. त्यांच्याबरोबर युवा क्रिकेटपटू आवेश खान आणि उमरान मलिक हेसुद्धा फोटोमध्ये दिसत आहेत.
शमीने हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘सरावात परतलो आहे. सराव सत्र चांगले राहिले. त्याबरोबरच आमच्या युवा प्रतिभाशाली क्रिकेटपटूंसोबत बोलून चांगले वाटले. न्यूझीलंडविरुद्धच्या येत्या सामन्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहोत.’
Back to the grind. Had a productive training session and loved talking to our young talented cricketers. Looking forward to our next game against NZ. #TeamIndia #mshami11 pic.twitter.com/BelhDORBRo
— ???????????????????????????????? ???????????????????? (@MdShami11) October 28, 2021
शमी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एकही विकेट घेऊ शकला नव्हता. भारताच्या १५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनीच संघाला विजय मिळवून दिला होता. पाकिस्तानच्या डावादरम्यान शमीने ३.५ षटकांमध्ये सर्वाधिक ४३ धावा खर्च करत एकही विकेट घेतली नव्हती.
परंतु आता तो आणि संपूर्ण भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध दमदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना रविवारी (३१ ऑक्टोबर) होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिज आणि बांगलादेशमध्ये ‘करा वा मरा’ची लढत, पराभूत होणाऱ्या संघाचा संपणार प्रवास!
टी२० विश्वचषकाच्या रणधुमाळीत ‘या’ स्टार वेगवान गोलंदाजाने सोडला भारतीय संघ, परतला मायदेशी
व्हेरॉकच्या रोहित चौधरीची भेदक गोलंदाजी, ४ विकेट्स घेत संघाला पोहोचवले अंतिम फेरीत






