---Advertisement---

“तुमचा मुलगा असल्याचा अभिमान वाटतो”, मोहम्मद शमीची वडिलांसाठी भावूक पोस्ट

On: गुरूवार, जानेवारी 28, 2021 12:43 PM
---Advertisement---

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने बुधवारी (२७ जानेवारी) सोशल मीडियावर वडीलांसाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या वडीलांचे २०१७ साली २७ जानेवारीला हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले होते. बुधवारी त्यांची चौथे पुण्यस्मरण होते. त्यामुळे शमी वडीलांच्या आठवणीने भावूक झाला होता.

शमीने त्याच्या वडीलांबरोबर हॉस्पिटलमध्ये काढलेला फोटो शेअर करत सोशल मीडियावर लिहिले की ‘४ वर्षे आज पूर्ण झाली. तुम्हाला अजून एकदा पाहण्याची इच्छा होते. तुम्ही दरवाजातून आत याल असे वाटत राहाते. पण मला माहित आहे, हे शक्य नाही. मला माहित आहे तुम्हाला माझे अश्रू जाणवतात आणि तुम्हाला मी रडू नये, असे वाटते. मी प्रार्थना करतो की ईश्वर मला ताकद देईल जशी तुम्ही दिली आणि मला तुम्हाला गमावल्याचे दु: ख सहन करण्याची ताकद मिळेल. तुमचा मुलगा असल्याचा अभिमान वाटतो. तुमची कमी खुप जाणवते. माझे तुमच्यावर खुप प्रेम आहे.’

शमी सध्या भारतीय संघातून दुखापतीमुळे बाहेर – 

मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या मनगटाला ऍडलेड येथे कसोटी सामना खेळताना दुसऱ्या डावात फलंदाजी करताना पॅट कमिन्सचा चेंडू हाताला लागला होता. त्यामुळे त्याचे मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतला होता.

या दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांनाही मुकणार आहे. इंग्लंडविरुद्ध ४ सामन्यांची कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथून सुरु होत आहे. पहिले दोन कसोटी सामने चेन्नई येथे होणार असून शमीचा या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. तसेच तो त्याच्या दुखापतीमुळे पुढील तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात खेळणार की नाही याबद्दलही प्रश्नचिन्ह आहे.

शमीची कारकिर्द –

मोहम्मद शमीने आत्तापर्यंत ५० कसोटी सामने खेळले असून यात त्याने १८० विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने ७९ वनडे सामने खेळले असून १४८ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने १२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १२ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विराट कोहलीचे चेन्नईत आगमन; फोटो व्हायरल

महिपाल लोमरोलच्या विस्फोटक खेळीमुळे राजस्थानची बिहारचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक

आयपीएल लिलावात सहभागी होण्याआधी संघसदस्यांना ‘ही’ गोष्ट करणे अनिवार्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---