---Advertisement---

महिपाल लोमरोलच्या विस्फोटक खेळीमुळे राजस्थानची बिहारचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक

On: गुरूवार, जानेवारी 28, 2021 11:22 AM
---Advertisement---

कोरोनानंतर भारतात पहिल्यांदाच देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात झाली असून सध्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीचा थरार सुरू आहे. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून प्रत्येक सामन्यात उत्तम संघर्ष बघायला मिळत आहे. नुकत्याच बाद फेरीतील पार पडलेल्या सामन्यात महिपाल लोमरोलच्या विस्फोटक खेळीच्या मदतीने राजस्थानने बिहारचा पराभव करत सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

प्रथम फलंदाजी करत असलेल्या राजस्थानने निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावत 164 धावा केल्या. राजस्थानकडून युवा फलंदाज महिपाल लोमरोलने 37 चेंडूत 5 चौकार व तितक्याच षटकारांच्या मदतीने 78 धावांची आक्रमक खेळी केली. तसेच सलामीवीर भरत शर्मा व अंकित लांबा यांनी प्रत्येकी 38 धावा केल्या.

बिहारचा संघ 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 4 गडी गमावत केवळ 148 धावाच करू शकला. बिहारकडून मंगल महरोरने 58 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली, पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अयशस्वी ठरला.

बडोदाही सेमीफायनमध्ये

दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात बडोदाने हरियाणाचा पराभव केला. हरियाणाने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावत 148 धावा केल्या होत्या. इतक्या छोट्या धावसंख्येचा देखील हरियाणा बचाव करणार अशी चिन्हे दिसत होती. शेवटच्या दोन षटकात 23 धावांची गरज असताना हरियाणाचा कर्णधार मोहित शर्माने टाकलेल्या 19 व्या षटकात केवळ 5 धावा दिल्या. त्यामुळे शेवटच्या षटकात बडोदाला 18 धावांची गरज होती. विसाव्या शब्दातील पहिल्या तीन चेंडूंवर केवळ 3 धावा आल्याने बडोदा संघावर दबाव जाणवत होता.

शेवटच्या 3 चेंडूंवर 15 धावांची गरज असताना फलंदाज विष्णू सोळंकीने प्रथम षटकार व त्यानंतर चौकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर 5 धावा गरजेच्या होत्या. याचवेळी सोळंकीने शानदार षटकार ठोकत बडोदाला एक अविस्मरणीय विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल लिलावात सहभागी होण्याआधी संघसदस्यांना ‘ही’ गोष्ट करणे अनिवार्य

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम; विराट व रोहित आहेत ‘या’ क्रमांकावर

शुभमंगल सावधान! अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर अडकला विवाहबंधनात, पाहा फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---