इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामाचा विजेता नवखा संघ गुजरात टायटन्स ठरला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात संघाने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्सने पराभव केला. यावेळी मोहम्मद शमीने एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला आहे.
शमीने या आयपीएल हंगामात १६ सामन्यांमध्ये २० विकेट्स घेतल्या, तर तो एकदाही फलंदाजीसाठी आला नाही. आयपीएलच्या हंगामातील संपूर्ण सामने खेळताना एखाद्या खेळाडूने एकदाही फलंदाजी केली नाही अशी घटना इतिहासात प्रथमच घडली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या साखळी सामन्यात फलंदाजी करण्याची वेळ शमीवर आली असती. कारण, गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने २० षटकात ९ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या होत्या. हा सामना त्यांनी ८ धावांनी जिंकला.
शमी या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये सहाव्या क्रमांकावर राहिला. त्याला २०२२च्या आयपीएल लिलावात गुजरातने ६.२५ कोटींमध्ये संघात घेतले.
भारतीय क्रिकेट संघाचा हा वेगवान गोलंदाज जुन्या चेंडूने विकेट्स काढण्यात पटाईत आहे. तसेच तो सुरूवातीचे षटकही चांगले टाकतो. मागील तीन हंगामात तो पंजाब किंग्जकडून खेळला. या तिन्ही हंगामात त्याने संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
आयपीएल २०१९मध्ये त्याने उत्तम गोलंदाजी करत १४ सामन्यांत १९ विकेट्स घेतल्या, तर २०२०मध्ये गोलंदाजीत सातत्य राखत मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात टाकलेल्या सुपर ओव्हरमध्ये ६ धावांचा बचाव केला होता. हा सामना पंजाबने जिंकला. तसेच २०२१ या यामध्ये त्याने १४ सामन्यांत १९ विकेट्स घेतल्या.
आयपीएल २०१३मध्ये कोलकाताकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या शमीला सुरूवातील फारच कमी सामन्यात संधी मिळाली. २०१४मध्ये दिल्ली डेयरडेविल्सने त्याला ४.२५ कोटीमध्ये संघात घेतले यावेळी त्याने १२ सामने खेळत ७ विकेट्स घेतल्या होत्या.
आयपीएलचे चार वेगवेगळ्या संघाकडूने खेळणाऱ्या शमीने ९३ सामन्यांत ९९ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित अन् विराटला डच्चू देत भारतीय दिग्गजाने निवडला टी२० विश्वचषकाचा संघ, पाहा कोणाला मिळालीय संधी
बिहारमधला सलूनवाला पंड्याचा जबरा फॅन; जिंकण्याच्या खुशीत स्वत:चं आणि दुकानाचं घातलं बारसं