भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. शमीनं भारतीय संघासाठी शेवटचा सामना 19 नोव्हेंबर 2023 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. ही एकदिवसीय विश्वचषकाची फायनल मॅच होती. यानंतर शमीच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. मात्र आता शमी पुनरागमन कधी करणार याबाबत मोठं अपडेट समोर आलं आहे.
‘पीटीआय’च्या रिपोर्टनुसार, मोहम्मद शमी ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी बंगालकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळू शकतो. रणजी ट्रॉफीला 11 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. 11 ऑक्टोबरला बंगालचा सामना उत्तर प्रदेशशी आहे. या सामन्यात शमी खेळू शकतो. 19 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. शमी या मालिकेत टीम इंडियाकडून खेळू शकतो.
वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी शमीचं संघात पुनरागमन होईल, याची बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जवळपास पुष्टी केली आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना जय शाह म्हणाले की, “आमचा संघ आधीच चांगला तयार आहे. आम्ही जसप्रीत बुमराहला काही काळासाठी आराम दिला. शमी फिट होण्याची शक्यता आहे. रोहित आणि विराट सारखे अनुभवी खेळाडू देखील फिट आहेत.”
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीकडे भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळण्याचा अनुभव आहे. तो टीम इंडियासाठी आतापर्यंत 64 कसोटी, 101 एकदिवसीय आणि 23 टी20 सामने खेळला आहे. कसोटीत त्यानं 229 बळी घेतले आहेत. तर एकदिवसीय मध्ये त्याच्या नावे 195 आणि टी20 मध्ये 24 बळी आहेत.
हेही वाचा –
जर केकेआरनं रिटेन केलं नाही तर कोणत्या संघाकडून खेळेल रिंकू सिंह? स्वत: दिलं उत्तर
“याआधी पंत माझ्या कॅप्टन्सीखाली खेळलाय, आता मला त्याच्या…”, भारतीय खेळाडूकडून कौतुक
भारताच्या युवा सलामीवीराला घाबरला ऑस्ट्रेलियन गोलंदाज! दिग्गजाकडे मागितली मदत