---Advertisement---

IND vs SA । कसोटी मालिकेतून शमीचा पत्ता कट! समोर आली महत्वाची माहिती

Mohammed Shami
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या फिटनेसबाबत महत्वाची बातमी समोर येत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. उभय संघात तीन सामन्यांची वनडे आणि त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळली जाणार आहे. पण कसोटी मालिकेसाठी महत्वाचा असणारा मोहम्मद शमी या दौऱ्यातून माघार घेऊ शकतो.

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेसाठी संघात वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेलीहोती. मोहम्मद शमी (Mohammed Shami) हादेखील त्या वरिष्ठ खेळाडूंपैकीच एक होता. पण उभय संघांतील कसोटी मालिकेसाठी विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासह शमी देखील संघाचा भाग होता. असे असले तरी, शमीचे संघातील स्थान निश्चित मानले जात नव्हते. फिटनेसच्या कारणास्तव अशी माहिती दिली गेली होती. आता शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पूर्णपणे फिट नसल्याचे समोर येत आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार विराट, रोहित, बुमराह यांच्यासह कसोटी मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ 15 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होईल. पण घोट्याच्या दुखापतीमुळे शमी या खेळाडूंसोबत दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार नाही, असे सांगितले जात आहे. शमीच्या बदली खेळाडूची अद्याप घोषणा केली गेली नाहीये. पण वनडे मालिकेत खेळणाऱ्या गोलंदाजांपैकीच एकाला कसोटीसाठी निवडले जाऊ शकते.

सध्या भारताचा टी-20 आणि वनडे संघ दक्षिण आफ्रिकेत आहेत. तसेच भारत अ संघ देखील दक्षिण आफ्रिकेमध्येच आहे. एकूम 75च्या आसपार भारतीय क्रिकेटपटू सध्या दक्षिण आफ्रिकेत असल्याचे सांगितले जात आहे. आफ्रिकी संघाविरुद्धची कसोटी मालिका 26 डिसेंबर म्हणजेच बॉक्सिंग डे रोजी सुरू होईल. पहिला सामना सेंचुरियनमध्ये, तर दुसरा सामना केप टाउनमध्ये आयोजित केला जाणार आहे. (Mohammed Shami may pull out of Test series against South Africa)

महत्वाच्या बातम्या – 
एम. जे. चषक निमंत्रित हॉकी स्पर्धेत २२ संघांचा सहभाग; शुक्रवारी प्रारंभ, महिला गटातही होणार रंगतदार सामने 
सिद्धीप्रभा फाऊंडेशन, विजय क्लब, शिवमुद्रा प्रतिष्ठान, एस.एस.जी. फाऊंडेशन यांची उपांत्य फेरीत धडक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---