जगभरात ओढवलेल्या कोरोना व्हायरस या जागतिक साथीच्या रोगाने क्रिकेटपटूंना मैदानापासून दूर केले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहेत. त्यामुळे घरात राहणाऱ्या क्रिकेटपटूंसाठी त्यांची फीटनेस हा आव्हानात्मक विषय बनला आहे. अशात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने फीट राहण्यासाठी देशी उपाय सुचवला आहे.
शमी (Mohammed Shami) सध्या त्याच्या गावी आहे. तेथे तो त्याच्या फार्म हाऊसमध्ये राहून फीटनेसवर काम करत आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शमीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. शमीने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “जास्त दबावात राहू नका, आपले उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करा.”
या व्हिडिओत तो शेतात पळताना दिसत आहे. विशेष म्हणजे शमी चपल्लांविना पळत आहे. शमीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच क्रिकेटप्रेमींकडून या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
Dont stress. Do your best.#TeamIndia pic.twitter.com/8rtnzjC1dw
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) April 24, 2020
शमीने भारताकडून ४९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४९७ धावा आणि २७.३६ च्या सरासरीने १८० विकेट्स घेतल्या आहेत. तर, ७७ वनडे सामने खेळताना त्याने १४७ धावा आणि २५.४२ च्या सरासरीने १४४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, ११ टी२० सामन्यात त्याने ३१.८३ च्या सरासरीने १२ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएलमध्ये ८ वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व करणारा हा एकमेव खेळाडू
-आता एबी-विराट खेळणार कॅप्टन कूल धोनीच्या नेतृत्त्वाखाली
-ज्या अकाऊंटवरुन धोनीला ट्रोल करण्यात आले तीच पोस्ट केली रिषभ पंतने लाईक