---Advertisement---

‘असे लोक खरे भारतीय असूच शकत नाहीत’, ट्रोल करणाऱ्यांवर बरसला मोहम्मद शमी

On: सोमवार, फेब्रुवारी 28, 2022 9:34 PM
Mohammed-Shami
---Advertisement---

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) पाकिस्तानविरुद्धच्या टी२० विश्वचषकात (PAK vs IND T20 World cup 2021) मिळालेल्या पराभवानंतर चांगलेच ट्रोल केले होते. त्याने आता यावर प्रतिक्रिया देत ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.

शमी म्हणाला की, “जे ट्रोल करतात ते खरे चाहते नाहीत आणि खरे भारतीयही नाहीत. मी कोणाचे प्रतिनिधित्व करतो हे मला माहिती आहे. मी माझ्या देशासाठी लढतो.” शमीला खूप ट्रोल केल्यानंतर विराटने त्याच्या समर्थनार्थ ट्रोलर्सना उत्तर दिले होते.

“अशा विचारांना काही इलाज नाही. ट्रोल करणारे खरे चाहते किंवा खरे भारतीय नाहीत. जर तुम्ही एखाद्या खेळाडूला आदर्श मानत असाल आणि नंतर असे वागले, तर तुम्ही भारताचे समर्थक नाहीत. अशा लोकांच्या कमेंटमुळे कोणी दुखावले जाऊ नये, असे मला वाटते,” असे तो म्हणाला.

“माझ्या मनात एकच गोष्ट सुरू होती. जर मी एखाद्याला माझा आदर्श मानत असेल, तर मी त्या व्यक्तीबद्दल कधीही वाईट बोलणार नाही आणि जर मला आदर्श मानणारे असं बोलत असतील, तर ते माझे आणि भारतीय संघाचे समर्थक असू शकत नाहीत. म्हणूनच ते काय करतात याची मला अजिबात पर्वा नाही.”

“अनोळखी सोशल मीडिया प्रोफाईल असलेले किंवा काही फॉलोअर्स असलेले लोक जर कोणाकडे बोट दाखवत असतील, तर त्यांच्याकडे गमावण्यासारखे काही नाही. जर आम्ही त्यांना आदर्श, सेलिब्रिटी, भारतीय क्रिकेटर म्हणून प्रतिसाद दिला, तर आम्ही त्यांना अनुचित महत्त्व देतो. आम्हाला त्यांच्यात सामील होण्याची गरज नाही.”

“आम्ही काय आहोत हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला भारत आमच्यासाठी काय आहे हे सांगण्याची गरज नाही. कारण, आम्ही देशाचे प्रतिनिधित्व करतो. आम्ही आमच्या देशासाठी लढतो. या ट्रोलर्सना प्रतिक्रिया देऊन काहीही सिद्ध करण्याची गरज नाही.”

शेवटी शमी त्याच्या संघर्षाबाबत म्हणाला की, “त्यावेळी काय संघर्ष झाला होता आणि कोण कुठे जाईल हे कोणालाच माहिती नव्हते. आम्ही टीव्हीवर जे पाहिले त्यापेक्षा वेगळे खेळाबद्दल फारसे माहिती नव्हते. माझे वडील एक मैत्री करण्यासारखे व्यक्ती आहेत आणि इतरांना मदत करतात. आमचे कुटुंब राजकारणाशी निगडीत आहे. त्यामुळे लोक येत-जात राहायचे. जेव्हा आम्हाला त्या भागात खेळपट्टी बनवण्यात आली, तेव्हा सरकारी शाळेशिवाय इतर कोणतीही सार्वजनिक सुविधा नव्हती. तेथे मुले येऊ लागली. आम्ही गट तयार केले आणि एकमेकांविरुद्ध खेळलो.”

मोहम्मद शमी हा भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने ५७ कसोटी सामने, ७९ वनडे सामने आणि १७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत २०९ विकेट्स, वनडेत १४८ विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी२०त १८ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---