भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या मालिकेसाठी काल शुक्रवारी (11 ऑक्टोबर) टीम इंडियाची घोषणा केली. मोहम्मद शमीशिवाय जवळपास सर्वच वरिष्ठ खेळाडू संघात दिसले. शमी या मालिकेतून पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. मात्र दुखापतीतून सावरणाऱ्या या वेगवान गोलंदाजाला टीम इंडियात सामील होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जवळपास वर्षभरापासून चाहते शमीच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीचा शमी महत्त्वाचा भाग आहे.
न्यूझीलंड कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी तयारी करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत शमीची अनुपस्थिती संघासाठी मोठी अडचण ठरू शकते. शमीच्या टाचेवर फेब्रुवारीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अशा परिस्थितीत तो टीम इंडियात कधी पुनरागमन करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियासाठी मोहम्मद शमी महत्त्वाचा गोलंदाज असेल. तो बऱ्याच काळापासून टीम इंडियासाठी खेळत आहे. अशा स्थितीत त्याचा अनुभव संघासाठी खूप महत्त्वाचा असेल.
स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. बुमराहशिवाय मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांचा वेगवान गोलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.
न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप
हेही वाचा-
ind vs ban; तिसऱ्या टी20 मध्ये पावसाचं सावट? सामन्यापूर्वी पाहा हैदराबादचा हवामान अंदाज
कसे असणार भारतीय संघाचे पुढचे ‘मास्टर प्लॅन’? प्रशिक्षकाने स्पष्टच सांगितले
IND vs NZ; कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा…!!!