भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. हसीन जहाँनं शमीवर अनेक गंभीर आरोप केले होते. अलीकडेच शमी भारतीय जनता पार्टी (भाजपा) त्याला लोकसभा निवडणुकीत तिकीट देऊ शकते या कारणावरून चर्चेत आला होता. मात्र या बातमीला अद्याप कुठलाही दुजोरा मिळालेला नाही. अशातच आता शमीच्या पत्नीनं पुन्हा एकदा त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी हसीन जहाँनं दावा केला आहे की, मोहम्मद शमी तिची हत्या करू शकतो!
हसीना जहाँनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यात तिनं मोहम्मद शमीवर आरोप करताना म्हटलं की, “माझा स्टार पती आणि त्याच्या कुटुंबानं माझ्यासोबत गैरवर्तन केलं. मला न्यायालयाची मदत घ्यावी लागली, पण मला हवी तशी मदत मिळाली नाही. अमरोहा पोलिसांनी माझा आणि माझ्या 3 वर्षाच्या मुलीचा छळ केला. सरकारही माझ्यावर होत असलेला अन्याय आणि अत्याचार बघत आहे. सत्य अजून लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही. कोलकात्याचं न्यायालयही माझ्यावर अन्याय करतं आहे.”
हसीन जहाँ पुढे म्हणाली, “हे सर्व माझ्यासोबत केलं जात आहे कारण मी मुस्लिम समुदायातून येते. जर मी हिंदू असते आणि माझ्यासोबत हे सर्व घडलं असतं तर कदाचित मला आतापर्यंत न्याय मिळाला असता. मोहम्मद शमी, भाजपा सरकार आणि यूपी पोलिस माझा खून करण्याचा कट रचत आहेत.”
View this post on Instagram
हसीन जहाँनं आपल्या पोस्टमध्ये अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. तिनं दावा केला आहे की, ती अमरोहा पोलिस एसपी सुधीर कुमार यांच्याकडून मदत घेण्याबाबत बोलली, परंतु सुधीर कुमार तिच्याशी असभ्यपणे वागले. एसपींना तिची भेट घेण्यास नकार दिल्याचा दावाही हसीन जहाँनं केला आहे. हसीन जहाँच्या या आरोपांवर मोहम्मदी शमीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
कोण आहे ऋतुराज गायकवाडची पत्नी उत्कर्षा पवार? क्रिकेटमध्ये कमावलंय मोठं नाव
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘हा’ 41 वर्षीय खेळाडू असेल भारताचा ध्वजवाहक, मेरी कोमकडेही मोठी जबाबदारी