---Advertisement---

मोहम्मद शमीला प्रत्युत्तर देण्यासाठी हसीन जहाँ बनली मुमताज; म्हणते, स्वत: ला…

On: मंगळवार, जून 9, 2020 4:40 PM
---Advertisement---

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट इतिहासात कदाचित कोणत्याही खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्यातील भांडण लोकांमध्ये सर्वात जास्त पोहोचले असेल तर याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ होय. त्यांच्यातील भांडण सर्व लोकांमध्ये आले आहे. सुरुवातीला हे भांडण केवळ मीडिया आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत होते. परंतु आता हा वाद सोशल मीडियामार्फत लोकांपर्यंत पोहोचत आहे.

हसीन (Hasin Jahan) अनेकवेळा आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ आणि फोटो शेअर करत शमीवर निशाना साधत असते. तसेच, जेव्हाही शमीला संधी मिळते, तेव्हा तो तिला प्रत्युत्तर देताना दिसतो. नुकतेच शमीने हसीनला आपले आरोप सिद्ध करण्यासाठी सांगितले होते.

शमीला (Mohammed Shami) प्रत्युत्तर देत हसीनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती मुमताजची भूमिका साकारताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “स्वत: ला सिद्ध करण्यासाठी आयुष्य खूप छोटे आहे.”

https://www.instagram.com/p/CBBJDBngivB/?utm_source=ig_web_copy_link

हसीनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिला आपल्या पोस्टमुळे मोहम्मद शमीच्या चाहत्यांच्या टीकांचा सामना करावा लागतो. यापूर्वी हसीनने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शमीबरोबरचा आपला टॉपलेस फोटो आणि डांसचा व्हिडिओ शेअर केला होता. ते पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---