सध्या भारतात विजय हजारे करंडक ही देशांतर्गत वनडे सामन्यांची स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेद्वारे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचा लहान भाऊ मोहम्मद कैफने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये पदार्पण केले आहे. शनिवारी बंगालच्या संघाकडून सामना खेळतांना त्याने आपले हे पदार्पण केले.
मोहम्मद कैफ २४ वर्षीय युवा अष्टपैलू खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी तसेच उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. यापूर्वी त्याला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी देखील बंगालच्या संघात स्थान मिळाले होते. मात्र एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र आज (२७ फेब्रुवारी) बंगालने जम्मू काश्मीर विरुद्ध खेळलेल्या सामन्याद्वारे त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली.
मोहम्मद शमीने केले अभिनंदन
भाऊ मोहम्मद कैफला आपले प्रथम श्रेणी पदार्पण करताना पाहून मोहम्मद शमी खुश झाल्याचे दिसून आले. शमीने ट्विटरवर पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला. तसेच लहान भावाचे अभिनंदन देखील केले. शमीने लिहिले, “विजय हजारे ट्रॉफीमध्ये पदार्पण केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन! आपण सगळेच या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो. आता तू तुझ्या स्वप्नाच्या एक पाऊल अजून जवळ पोहोचला आहेस. खूप मेहनत कर.”
Congratulations to my brother on your Vijay Hazare Trophy debut. We have waited for this moment. You are one step closer to the ultimate dream. Keep working hard.#TeamIndia #mshami11 pic.twitter.com/kqp2xGAk1F
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) February 27, 2021
दरम्यान, मोहम्मद कैफला आपल्या पदार्पणाच्या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. मात्र त्याला ८ षटके गोलंदाजी करायला मिळाली. परंतु तो काहीसा महागडा ठरला. त्याने आठ षटकात ६० धावा दिल्या. मात्र त्याला एकही बळी मिळवता आला नाही. त्यामुळे पदार्पणाचा सामना त्याच्यासाठी काहीसा निराशाजनक ठरला.
मात्र त्याचवेळी दुसरीकडे त्याच्या संघ सहकाऱ्यांनी उत्तम प्रदर्शन केल्याने बंगालने हा सामना सहजपणे जिंकला. बंगालने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ४ बाद ३६८ धावांचा डोंगर उभा केला होता. या अवघड लक्ष्याचा पाठलाग करताना जम्मू काश्मीरचा संघ ४५.३ षटकात २८६ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे बंगालने ८२ धावांनी विजय प्राप्त केला.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! लखनऊ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मुंबईकर अय्यरचा फलंदाजीत बल्ले बल्ले! सलग २ सामन्यात झुंजार शतकं, आता इंग्लंडला पाजणार पराभवाचं पाणी
संतापजनक! ऍरॉन फिंचच्या खराब कामगिरीनंतर चाहत्याने पत्नीला दिली धमकी, आक्षेपार्ह भाषेचा केला वापर