---Advertisement---

वर्ल्डकमधील शमीच्या प्रदर्शनची घेतली जाणार दखल, वेगवान गोलंदाजाला भारत सरकारकडून मिळणार खास भेट!

On: बुधवार, डिसेंबर 13, 2023 6:14 PM
Mohammed Shami
---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात आपली झाप पाडली. भारतीय संघासाठी मागच्या काही वर्षांमध्ये शमी महत्वाचा खेळाडू ठरला आहे. त्याने अनेकदा संघासाठी मॅच विनरची भूमिका पार पाडली आहे. विश्वचषकात भारताला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यातही शमीचा वाटा मोठा होता. याचसाठी आता शमीला भारत सरकारकडून खास बक्षीस मिळण्याचे संकेत दिले जात आहे.

भारत सरकारकडून दिला जाणारा अर्जुन पुरस्कार यावर्षी मोहम्मद शमी याला मिळू शकतो. वेगवान गोलंदाजाच्या नावावर या पुरस्कारासाठी विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. तसेच शेमीचे निवड समितीकडून शमीचे नाव या पुरस्कारासाठी सुचवले गेले आहे. वनडे विश्वचषक 2023 मध्ये शमीने सर्वात जास्त विकेट्स घेतल्या असून बीसीसीआयकडून त्याच्या प्रदर्शनाला दाद दिली जात आहे.

मेजर ध्यानचंद क्रीडारत्न पुरस्कारानंतर अर्जुन पुरस्कार हा क्रीडा श्रेत्रातील कामगिरीसाठी दिली जाणारा भारतातील दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयाकडे अर्जुन पुरस्कारासाठी शमीच्या नावाची शिफारस केली होती.

दरम्यान, वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघ अंतिम सामन्यात येऊन पराभूत झाला. पण यजमान संघाने अंतिम सामन्यापूर्वी केलेल प्रदर्शन नक्कीच कौतुकास्पद राहिले. यात शमीचे विशेष कौतुक करता येईल. पहिल्या चार सामन्यांमध्ये शमीला बेंचवर बसवले गेले होते. पण त्यानंतर हार्दिक पंड्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आणि शणीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. पुढच्या सात सामन्यांमध्ये शमीने 12.06 सरासरी आणि 5.68 च्या इकॉनॉमी रेटने 15 विकेट्स घेतल्या. (Mohammed Shami’s name has been recommended for Arjun Award 2023)

महत्वाच्या बातम्या – 
INDvsSA: सामन्यानंतर तिलक वर्माचे मोठे विधान; पराभवाचे कारण सांगत म्हणाला, ‘आमचे सलामीवीर फ्लॉप…’ 
टीम इंडियाच्या ‘या’ गोलंदाजाबाबत दिग्गजाचं मोठं विधान; म्हणाला, ‘आयपीएलपासूनच त्याची…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---