ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे शनिवारपासून (२६ डिसेंबर) सुरु झाला आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात १ बाद ३६ धावा केल्या आहेत. तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघ १९५ धावांवरच गारद झाला. यात भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि मोहम्मद सिराज यांचे मोठे योगदान राहिले. दरम्यान एक दुर्घटना होता- होता टळली.
झाले असे की, ऑस्ट्रेलिया संघाचा डाव चालू होता. ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लॅब्यूशाने आणि ट्रॅविस हेड फलंदाजी करत होते. वेगवान गोलंदाज सिराज डावातील ३६वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याने वेगाने धावत येत षटकातील दुसरा चेंडू टाकला. त्याचा बाउंसर इतक्या वरुन आला की, तो थेट लॅब्यूशानेच्या हेल्मेटवर लागला.
सिराजने टाकलेला तो चेंडू इतक्या जोराने लॅब्यूशानेच्या हेल्मेटला लागला की, सर्वांना वाटले लॅब्यूशानेला गंभीर दुखापत झाली असावी. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे फिजिओ मैदानावर आले आणि त्यांनी लॅब्यूशानेचा तपास केला. पण लॅब्यूशाने व्यवस्थित असल्याचे दिसले. त्याने पुढे फलंदाजीही केली. शेवटी ४ चौकारांच्या मदतीने ४८ धावा करत लॅब्यूशाने बाद झाला. महत्त्वाचे म्हणजे, सिराजनेच शुबमन गिलच्या हातून त्याला झेलबाद केले.
असे असले तरी, लॅब्यूशानेची दुखापत खरोखरच गंभीर आहे का नाही, हे अद्याप माहिती नाही.
https://twitter.com/cricketcomau/status/1342663517854289920?s=20
https://twitter.com/7Cricket/status/1342664025944035328?s=20
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बऱ्याचदा घडलीय ही घटना
यापुर्वीही बऱ्याचदा फलंदाजाच्या डोक्याला चेंडू लागल्याच्या घटना घडल्या आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेल्या दौऱ्यावरच यापुर्वी अशी घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज विल पुकोवस्कीच्या डोक्याला चेंडू लागला होता. कसोटी मालिकेपूर्वी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघात तीन दिवसीय सराव सामना झाला होता. या सामन्यादरम्यान फलंदाजी करत असताना चेंडू डोक्यावर आदळल्याने पुकोस्कीला दुखापत झाली होती. तो अजूनही या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही.
तसेच बॉक्सिंग डे कसोटीतून पुनरागमन केलेल्या भारतीय अष्टपैलू रविंद्र जडेजाच्याही डोक्याला चेंडू लागल्याने दुखापत झाली होती. पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाकडून शेवटच्या षटकात फलंदाजी करत असताना जडेजाच्या हेल्मेटलवर चेंडू लागला होता. त्यामुळे जडेजाने क्षेत्ररक्षण केले नव्हते. त्याच्याऐवजी त्याचा कन्कशन सबस्टिट्यूट (दुखापतीमुळे आलेला बदली खेळाडू) म्हणून युजवेंद्र चहल क्षेत्ररक्षणासाठी आला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS : पहिल्या दिवसाखेर भारताच्या १ बाद ३६ धावा, पदार्पण करणाऱ्या शुबमन गिलची शानदार सुरुवात
‘बॉक्सिंग डे’ सामन्यातून कसोटी कारकिर्दीचा श्रीगणेशा करणारे भारतीय खेळाडू, ही आहेत नावे
कौतुकास्पद! पदार्पणवीर सिराजचे हनुमा विहारीने वाढवले मनोबल; ‘हे’ होते कारण