क्रिकेटमध्ये अनेक विक्रम होताना आपण पाहतो. मात्र, काही नकोसे विक्रमही असतात, जे त्या खेळाडूच्या नावावर कायमचे नोंदवले जातात. असाच काहीसा नकोसा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या नावावर नोंदवला गेला आहे. कदाचित ही नकोशी कामगिरी सिराजला स्वप्नातही आठवावी वाटणार नाही. चला तर सिराजने नेमकं काय केलंय, सविस्तर जाणून घेऊयात…
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स (Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians) संघात खेळल्या गेलेल्या या सामन्यात मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने लक्ष वेधले. यामागील कारण ठरले, त्याने टाकलेले 19वे षटक. या षटकात सिराजने जे काही केले, त्यामुळे आयपीएल इतिहासात आतापर्यंत न घडलेली घटना त्याने करून दाखवली. मात्र, ही नकोशी कामगिरी करणारी घटना ठरली.
सिराजची नकोशी कामगिरी
मुंबई इंडियन्सच्या डावातील 19वे षटक बेंगलोरचा मोहम्मद सिराज टाकत होता. यावेळी स्ट्राईकवर अर्शद खान (Arshad Khan) होता. सिराजचे पहिले चेंडू अर्शदने खेळून काढले. त्यानंतर सिराजने तिलक वर्मा (Tilak Varma) याला तिसरा चेंडू टाकला पण तो वाईड ठरला. यासह त्याने एका पाठोपाठ एक असे चार चेंडू वाईड टाकले. त्यानंतर तिलकने 2 धावा घेतल्या. इथे सिराजने पहिले दोन चेंडू + चार वाईड + तिसरा चेंडू असे 7 वेळा चेंडू टाकला. त्यानंतर त्याने चौथा चेंडू टाकला असता तिलकने चौकार मारला. पुन्हा पाचवा चेंडू त्याने वाईड टाकला. यानंतर त्याने पाचवाच चेंडू पुन्हा टाकला असताना तिलकने पुन्हा चौकार मारला. शेवटी सहावा चेंडू त्याने सुदैवाने निर्धाव टाकला. अशाप्रकारे त्याने पहिल्या चार वाईड चेंडूंनतर आणखी एक वाईड चेंडू टाकत एका षटकात 6 ऐवजी 11 चेंडू टाकले. या षटकात त्याने वाईडच्या 5 धावा अधिक दिल्या. त्यामुळे या षटकात मुंबईला एकूण 16 धावा मिळाल्या. मात्र, एवढे होऊनदेखील कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याने समंजस्यपणे परिस्थिती हाताळली.
That's a SCREAMER!
Beautifully taken by @RCBTweets skipper @faf1307 👌#MI 145/7 with 8 balls to go!
Follow the match ▶️ https://t.co/ws391sGhme#TATAIPL | #RCBvMI pic.twitter.com/LQn0XqSaOM
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
मुंबईचा डाव
मुंबईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट्स गमावत 171 धावा केल्या. मुंबईकडून तिलकने 46 चेंडूत 4 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक नाबाद 84 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त नेहाल वढेराने 21, तर सूर्यकुमार यादव 15 आणि अर्शद खान नाबाद 15 धावांचे योगदान दिले. इतर एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.
यावेळी बेंगलोरकडून गोलंदाजी करताना कर्ण शर्मा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मोहम्मद सिराज याने 4 षटके गोलंदाजी करताना 6 वाईड टाकत 21 धावा खर्च करून 1 विकेट घेतली. तसेच, रीस टोप्ले, आकाश दीप, हर्षल पटेल आणि मायकल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्याच सामन्यात आरसीबीला धक्का! चालू सामन्यात निखळला प्रमुख गोलंदाजाचा खांदा, दुखापत गंभीर
फक्त 1 धाव करूनही हिटमॅन ‘रेकॉर्ड बुक’मध्ये! सचिननंतर रोहित दुसराच