चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा दुसरा २८६ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारताने पहिल्या डावातील १९५ धावांची आघाडीसह इंग्लंडला विजयासाठी ४८२ धावांचे भलेमोठे आव्हान दिले आहे. या सामन्यादरम्यान ११ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सिराजने २ खणखणीत षटकार ठोकले.
भारताच्या दुसऱ्या डावात २३७ धावांवर ९ विकेट्स गेल्या होत्या. यावेळी खेळपट्टीवर असलेल्या आर अश्विनच्या ७७ धावा झाल्या होत्या आणि मोहम्मद सिराज ११ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्यावेळी आता अश्विनचे शतक हुकते की काय असे वाटत असतानाच सिराजने जबाबदारीचे भान राखत अश्विनला भक्कम साथ दिली. त्याने अश्विनचे शतक होईपर्यंत कोणतीच जोखीम न पत्करता बचावात्मक खेळ केला.
पण जसे अश्विनने त्याचे शतक पूर्ण केले तसे सिराजनेही आक्रमक खेळ केला. त्याने जॅक लीच विरुद्ध २ खणखणीत षटकार ठोकले. त्याच्या या षटकारांवर ड्रेसिंगरुममध्ये बसलेल्या भारतीय क्रिकेटपटूंनीही जोरदार आनंद व्यक्त केला. अखेर ८६ व्या षटकात अश्विन १०६ धावांवर बाद झाला आणि भारताचा डाव संपला. यावेळी सिराजने २१ चेंडूत २ षटकारांसह नाबाद १६ धावा केल्या. याबरोबरच त्याने शेवटच्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारीही केली.
https://twitter.com/its__ammar/status/1361263287959232512
https://twitter.com/its__ammar/status/1361261244120981505
Reaction of kohli on siraj's six #INDvENG #INDvsENG pic.twitter.com/ojKLveeH1D
— indian cricket 🇮🇳 (@indiancrickket) February 15, 2021
ड्रेसिंग रुममध्ये जंगी स्वागत –
सिराजच्या या कामगिरीचे डाव संपल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर जोरदार स्वागतही झाले. अश्विन आणि सिराजचे स्वागत करण्यासाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींसह सपोर्ट स्टाफ ड्रेसिंग रुमबाहेर आला होता. एवढेच नाही तर कर्णधार विराट कोहलीही बाऊंड्री लाईनपाशी येऊन दोघांचे स्वागत करण्यासाठी थांबला होता.
विराटचेही अर्धशतक –
अश्विन व्यतिरिक्त भारताच्या दुसऱ्या डावात कर्णधार विराट कोहलीने ६२ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच आर अश्विनसह ९६ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने इंग्लंडला ४८२ धावांचे आव्हान देण्यास मोठी मदत झाली.
इंग्लंडकडून गोलंदाजीत या डावात जॅक लीच आणि मोईन अलीेने प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. तर स्टोनने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
कहर! चेन्नई कसोटीत अश्विनचे शतक अन् सोबतच बळींचा पंचक, याआधी ‘इतक्यांदा’ केलंय असं
इंग्लंडविरुद्ध तब्बल ५५ वर्षांनंतर आर अश्विनने करुन दाखवली ‘ही’ खास कामगिरी
चेन्नई कसोटीत विराटचे झुंजार अर्धशतक, गांगुलीला पछाडत ‘या’ स्थानी झेप