भारत आणि बांगलादेश या संघातील दुसरा एकदिवसीय सामना ढाका येथे खेळवला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, यजमान संघाचा हा निर्णय चुकीचा ठरला. संघाचा सलामीवीर अनामुल हक लवकर बाद झाला. मोहम्मद सिराज याने त्याला तंबूत पाठवले. या महत्वाच्या सामन्यात सिराजने चांगली गोलंदाजी करताना दिसला. अशातच या उजव्या हाताच्या गोलंदाजाचा एक व्हिडीओ सोशल मिडीओवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिराज बांगलादेश संघाचा फलंदाज नजमुल होसेन शंटो याची स्लेेजिंग करताना दिसला.
ही घटना आठव्या षटकात घडली. आठव्या षटकात मोहम्मद सिराज (Mohmmed Siraj) गोलंदाजीसाठी आला, तेव्हा त्याने नजमुल होसेन शंटो (Najmul Hossain Shanto) याची स्लेजिंग केली. गोलंदाजी करताना सिराजने शंटोला रागाने पाहिले आणि काही शब्द बोलले. यामुळे या भारतीय गोलंदाजाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Muhammad Siraj sledging Shanto!#INDvsBAN | #INDvBANhttps://t.co/JsCQzGIns3
— Fans Crickets (@_fans_cricket) December 7, 2022
दुसरा एकदिवसीय सामना जिंकणे भारतासाठी गरजेचे
भारताने एकदिवसीय मालिकेेतील पहिला सामना ढाका येथे खेळला होता. ज्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. तीन एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेत यजमान संघ 1-0ने पुढे आहे. या मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारतीय संघाला विजय मिळवणे गरजेचे आहे. तसेेच बांगलादेश संघ हा सामना जिंकून ही मालिकेत 2-0 ची आघाडी घेऊन मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दोन बदल केले होते, तर बांगलादेश संघ एका बदलासोबत मैदानात उतरला.
भारत आणि बांगलादेश या संघातील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने निर्धारित 50 षटकात 271 धावा केल्या. शंटो याने या सामन्यात 35 चेंडूत 21 धावा केल्या. आपल्या या डावात त्याने 3 चौकार मारले आणि उमरान मलिक याच्या चेंडूवर तो बाद झाला.(Mohammed Siraj spotted doing sledging Najmul Hossain Shanto)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘नाही बनायचं ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार’, वॉर्नरसाठी क्रिकेटपेक्षा कुटुंब महत्वाचे
मेहदी हसनच्या शतकामुळे बांगलादेशने उभारला 271 धावांचा डोंगर, भारत करणार का पार?