कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंग धोनीला क्रिकेटच्या मैदानावर आपण अनेकदा रागवताना पाहिले आहे. यातील सर्वात मोठी घटना आयपीएल 2019 दरम्यान घडली. जेव्हा धोनी थेट सामन्यात नो बॉलच्या वादामुळे मैदानात उतरला आणि पंचांशी भांडू लागला. आता सीएसकेच्या माजी वेगवान गोलंदाजाने या घटनेबद्दल बोलले आहे आणि त्या वेळी ड्रेसिंग रूममध्ये काय वातावरण होते ते सांगितले आहे.
आयपीएल 2019 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान अंपायरने नो बॉल देऊन निर्णय मागे घेतल्यानंतर वाद झाला होता. शेवटच्या षटकात सीएसकेला विजयासाठी 8 धावांची गरज होती. बेन स्टोक्सचा एक चेंडू कमरेच्या वर होता, एका अंपायरने त्याला नो बॉल दिला तर स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या दुसऱ्या अंपायरने हा निर्णय उलटवला. यामुळे संतापलेल्या धोनीने थेट अंपायरशी भिडला. ते ही भरमैदानात जाऊन त्याने अंपायरशी वाद घातला होता.
या घटनेची आठवण करून देत मोहित शर्मा एका पॉडकास्टवर म्हणाला, “आम्ही डगआउटमध्ये होतो. आम्ही सांगत होतो, जाऊ नकोस, जाऊ नकोस, जाऊ नकोस. पण त्याने मागे वळूनही पाहिले नाही. तो थेट मैदानात घुसला. चुकीच्या वेळी आऊट झाल्यामुळे तो आधीच संतापला होता. परत त्यात पुढच्या चेंडू नो बॉल असूनही अंपायरने तो दिला नाही. त्यावेळी धोनी खूपच चिडलेला होता. तेव्हा तो आऊट होऊन नुकताच डगआऊटवर आला होता.
मोहित पुढे म्हणाला, “जेव्हा तो परत आला तेव्हा त्याने मला लॅपटॉप आणायला सांगितले. त्यानंतर व्हिडिओ विश्लेषकाने त्याला व्हिडिओ दाखवला आणि तो म्हणाला, ‘तो नो-बॉल होता.’ त्यानंतर मात्र मैदानात गेल्याचाही पश्चाताप झाला. पण हा सामना इतका रोमांचक होता की हे सगळं डोळ्यांच्या उघड्या क्षणी घडलं.” तर या घटनेला 5 वर्षे झाली, पण माहीचे ते अवतार आजही चाहत्यांच्या मनात ताजे आहे.
हेही वाचा-
मनू भाकरचा ट्रोलर्संना चोख प्रत्युत्तर; म्हणाली “हा माझा सुंदर….”, या कारणामुळे झाली होती ट्रोल
IPL 2025: रिटेंशनबाबत बीसीसीआय घेऊ शकते हा निर्णय, मुंबई इंडियन्सला मोठा होणार फायदा?
IPL 2025: हा अनुभवी खेळाडू 10 वर्षांनंतर ‘सीएसके’मध्ये परतणार!