इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (दि. 22 एप्रिल पहिला सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात अखेरच्या चेंडूपर्यंत जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. अखेर गुजरातने आपल्या अनुभवी गोलंदाजांच्या जोरावर 7 धावांनी एक रोमांचक विजय मिळवला. या विजयाचा नायक अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्मा हा ठरला. अखेरच्या षटकात त्याने केलेल्या गोलंदाजीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आतापर्यंत त्याची कामगिरीही स्वप्नवत राहिली असून, सोशल मीडियावर त्याचे जोरदार कौतुक होत आहे.
लखनऊच्या शिस्तबद्ध गोलंदाजी पुढे गुजरात संघाला केवळ 135 धावा करता आल्या होत्या. हार्दिक पंड्याने अर्धशतक झळकावत गुजरातला इथपर्यंत पोहोचवले. या धावांचा पाठलाग करताना लखनऊ संघासाठी कोणीही फारसा आक्रमक खेळ दाखवला नाही. लखनऊ संघाला अखेरच्या पाच षटकात 30 धावांची गरज होती. मात्र, केएल राहुल व आयुष बदोनी यांना मोठे फटके खेळण्यात अपयश आले. अखेरच्या दोन षटकात जिंकण्यासाठी 17 धावांची गरज असताना मोहम्मद शमी याने केवळ पाचच धावा दिल्या. मोहित शर्मा याने अखेरचे षटक टाकताना अर्धशतक करून खेळत असलेल्या राहुलला व स्टॉयनिसला बाद करून सामना गुजरातच्या बाजूने नेला. त्याने केवळ चार धावा देत संघाला एक अशक्यप्राय विजय मिळवून दिला.
मोहित शर्मा काही वर्षांपूर्वी आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक होता. 2014 आयपीएल मध्ये त्याने पर्पल कॅप आपल्या नावे केलेली. तसेच त्याने भारतीय संघासाठी दोन विश्वचषक देखील खेळले. त्यानंतर मात्र त्याच्या कारकिर्दीत उतार आला. 2022 हंगामात कोणीही त्याच्यावर बोलीन लावल्याने गुजरातने त्याला नेट बॉलर म्हणून आपल्या सोबत घेतले. त्यानंतर या हंगामात बेस प्राईसवर त्याला खरेदी केले.
या हंगामातील आपला पहिला सामना करताना त्याने पंजाबविरुद्ध सामनावीर होण्याचा मान मिळवला होता. पुन्हा एकदा अशीच कामगिरी करत आपण कमबॅक मॅन असल्याचे सिद्ध केले.
(Mohit Sharma Phoenix Story Of IPL 2023 Comeback Match Winner For Gujarat Titans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
थरारक सामन्यात गुजरातचा लखनऊला धोबीपछाड! 136 धावांचा बचाव करताना शमी-मोहित बनले नायक
पुन्हा आरसीबी दिसणार ‘ग्रीन जर्सी’मध्ये! सलग 13 व्या वर्षी जपणार सामाजिक बांधिलकी