भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने २०१३ला आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याच वर्षी त्याला झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचीही संधी मिळाली होती.
सीएसकेकडून खेळताना मोहितने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली शानदार प्रदर्शन केले होते. दिल्ली कॅपिटल्सच्या लाईव्ह चॅटदरम्यान मोहित धोनीसोबतचे आपले अनुभव सांगताना म्हणाला, ‘सनराइजर्स हैद्राबादविरुद्धच्या एका सामन्यादरम्यान धोनी मैदानावरच मला रागावला होता. त्याच्या रागाला पाहून मी खूप घाबरलो होतो.’ त्यावेळी धोनी मोहित आणि सीएसकेचा दुसरा मध्यमगती गोलंदाज ईश्वर पांडे यांच्यातील गोलंदाजी टाकताना झालेल्या गैरसमजामुळे चिडला होता.
२०२० आयपीएल मोसमासाठी मोहित दिल्ली कॅपिटल्स संघात सामील झाला आहे.
मोहित म्हणाला की, “त्या सामन्यात ईश्वरने पहिले षटक टाकले होते आणि आशिष नेहरा दुसरे षटक टाकत होता. धोनी त्यावेळी माझ्याजवळच उभा होता आणि तो मला म्हणाला पुढच्या षटकात मी तूला गोलंदाजी देईन. तेवढ्यातच नेहराने एक विकेट घेतली आणि आम्ही सर्वजण मैदानावर विकेटचा जल्लोष साजरा करण्यासाठी एकत्र आलो आणि धोनीने ईश्वरला पुढचे षटक गोलंदाजी करण्यास सांगितले. पण, मला या गोष्टीचा अंदाज नव्हता की धोनीने ईश्वरला पुढचे षटक टाकण्यास सांगितले होते.’
‘नेहराचे षटक पूर्ण झाले आणि ईश्वर गोलंदाजीसाठी पुढे आला. तेव्हा मी त्याला म्हणालो, धोनीने मला गोलंदाजी करण्यासाठी सांगितले आहे. मी माझी टोपी पंचाकडे दिली आणि गोलंदाजीसाठी क्रिजवर गेलो. त्यावेळी माही कोणाशी तरी बोलण्यात व्यस्त होता.’
‘त्याने हे नाही पाहिले की मी गोलंदाजीसाठी चाललो होतो. नेहमी रन अपपुर्वी मी थोड्या उड्या मारत असतो. मी २-३ स्टेप घेतल्या आणि तेवढ्यात धोनीची नजर माझ्यावर पडली. मी पाहिले तो हवेत हाथ हलवत होता. तेव्हा ते बघून मी गोंधळात पडलो की मी काय चुकीचे केले आहे. मी अजून चेंडू पण टाकला नाही. नाही कोणत्या फलंदाजाने माझ्या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारला आहे. मग, तरी धोनी माझ्याकडे रागाने का बघत आहे,’ असे पुढे बोलताना मोहित म्हणाला.
धोनीने माझ्याजवळ येऊन मला सांगितले की त्याने ईश्वरला पुढचे षटक गोलंदाजी करायला दिले होते. पण, अचानक पंच त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणाले मोहितने सुरुवात केली आहे. त्यावेळी धोनीचा तो रागावलेला चेहरा खूप भयावह होता,’ असे मोहित म्हणाला. Mohit sharma scared to ms dhoni reaction during ipl match.
त्यावेळी मोहितने षटक सुरू ठेवताना युसूफ पठाणला बाद केले होते. पण तरीही धोनीचा राग शांत झाला नव्हता. त्याने मला आणि ईश्वरला बोलावून घेतले आणि त्यांची कानउघडणी केली असल्याचेही मोहितने सांगितले.
२०१९पर्यंत मोहितने आयपीएलमध्ये एकूण ८५ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २६.६४च्या सरासरीने ९१ विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा ८.४१ इतका होता. त्याला २०२०च्या आयपीएलसाठी दिल्ली कॅपिटल्सने त्याला ५० लाख रुपयांना विकत घेतले.
ट्रेंडिंग घडोमोडी-
वय केवळ २६ वर्षेे; किडनी, लिव्हर झालेत फेल आता कोरोना पॉझिटिव्हही आढळला हा क्रिकेटर
कॅप्टनकूल धोनी म्हणतो, ‘मलाही दबाव येतो, मला पण भीती…
टेनिसपटू सानिया मिर्झाचे आहेत या क्रिकेट कर्णधारांशी कौटुंबिक संबंध






