पाकिस्तानी संघाने नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवला. या मालिकेत पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने आपल्या कामगिरीने सगळ्यांनाच प्रभावित केले. रिझवानने दोन कसोटी सामन्यात १६६ धावा करताना एक शतक देखील झळकावले.
मात्र आता रिझवान एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या नावांचे उच्चार करताना तो गोंधळलेला दिसला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता चर्चेत आहे.
एनरिच नोर्टजेच्या नावात केला घोळ
मोहम्मद रिझवान दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत असतांना हा प्रकार घडला. रिझवानला दक्षिण आफ्रिकन गोलंदाज एनरिच नोर्टजेने घेतलेल्या ५ बळींचा उल्लेख करायचा होता. मात्र त्यावेळी त्याने बोलताना “हसन अलीने ५ बळी घेतले. तसेच त्यांचा ‘नोर्टजे आहे की नोकिया’, जो कोणी आहे, त्यानेदेखील ५ बळी घेतले. माझा अर्थ हा आहे की तोदेखील वेगवान गोलंदाज आहे.”
त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचाच फिरकीपटू जॉर्ज लिंडे याचेही नाव उच्चारताना रिझवानने घोळ केला. लिंडेच्या नावाचा उच्चार त्याने ‘लुंडी’ असा केला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होतो आहे. लोकांनी या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.
Nokia Hai… Lundi Hai… Jo Bhi Hai 😂 pic.twitter.com/f45CMSLw0Q
— Arfa Feroz Zake (@ArfaSays_) February 7, 2021
दरम्यान, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर २-० असा विजय मिळवत निर्भेळ यश संपादन केले. त्यांनतर दोन्ही संघ आता ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज होत आहेत. ११ फेब्रुवारीपासून या सामन्यांना सुरुवात होईल. हे तीनही सामने लाहोरच्या गडाफी स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
टी नटराजन या महत्त्वाच्या मालिकेतून बाहेर, बीसीसीआयने घेतला महत्त्वाचा निर्णय
टीम इंडियाच्या विश्वविजयावर आधारित ८३ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख ठरली, या दिवशी होणार रिलीज