मोहन बगान आणि पूर्व बंगाल संघाचे परदेशी खेळाडू तसेच कर्मचारी पुढच्या मंगळवारी आपल्या देशात परत जाणार आहेत. त्यामुळे त्यांना बसचा प्रवास करत दिल्लीला जावे लागणार आहे. तिथून ते ऍमस्टरडॅमसाठी रवाना होणार आहेत.
मोहन बगान (Mohun Bagan) आणि पूर्व बंगाल (East Bengal) या दोन्ही संघाचे सर्व खेळाडू कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन केल्यानंतर भारतात अडकले होते.
पूर्व बंगालचे स्पॅनिश प्रशिक्षक मारिओ रिवेरा (Mario Rivera) म्हणाले की, “मी स्पेनला परतणार असल्यामुळे माझ्या कुटुंबाला खुप आनंद झाला आहे. सर्व काही व्यवस्थित आहे आणि मी रविवारी सकाळी रवाना होणार आहे. हा प्रवास खूप दूरचा असणार असेल याl काही शंका नाही. परंतु याशिवाय इतर मार्गही नाही, नाहीतर इथेच रहावे लागले.”
या प्रवासात रिवेरा वाराणसीमध्ये थांबणार आहेत. नेदरलँडच्या दूतावासाने त्यांना घेऊन जाण्यासाठी डच एअरवेजची खास विमान व्यवस्था केली आहे. तिथून ते त्यांच्या देशात जाणार आहेत. मोहन बगान संघामध्ये स्पेनचे ४ खेळाडू आणि प्रशिक्षक आहेत. तर पूर्व बंगाल संघात स्पेनचे ५ खेळाडू आणि प्रशिक्षक आहेत.
पूर्व बंगाल संघामध्ये स्पेनचे ५ खेळाडू आणि प्रशिक्षक मारिओ रिवेरा आहेत. तर कोस्टारिका आणि सेनेगलचाही प्रत्येकी एक खेळाडू आहेत. मोहन बगान संघात स्पेनचे ५, त्रिनिदाद, सेनेगल आणि ताजिकिस्तानचे एक- एक खेळाडू आहेत. मोहन बगान संघाचे सहाय्यक प्रशिक्षक पोलँड्से आणि ट्रेनर लिथुयानिआवरून आहेत.
पूर्व बंगालच्या स्पॅनिश फुटबॉलपटूने सांगितले की, “आम्ही सुरुवातीला दिल्लीला कसे पोहोचता येईल याची व्यवस्था करत होतो.” परदेशी खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचारी हे सदस्य आपापल्या दूतावासांशी संपर्कात आहेत. तसेच त्यांच्यासाठी खास विमान सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आय लीग फुटबॉल स्पर्धेतील उर्वरित २८ सामने रद्द करण्यात आले आहेत. तसेच मोहन बगान संघाला अधिकृतरित्या विजयी घोषित करण्यात आले आहे. मोहन बगान संघाला २०१९-२० साठी हिरो आय लीगचा विजयी घोषित करण्यात आले. कारण ते १४ मार्च २०२०ला निलंबित झालेल्या हिरो आय लीगच्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होते.
मोहन बगान संघाने ४ सामने खेळायचे शिल्लक असतानाच केवळ १६ सामन्यात च स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. अधिकृत आदेशानंतर १४ मार्चला निलंबित झालेल्या आय लीगपूर्वी मोहन बगान संघाला १६ सामन्यांमध्ये एकूण ३९ गुण होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आम्हाला भारताला भारतात कसोटीत करायचे आहे पराभूत
-ड्रीम ११: लग्न न झालेल्या क्रिकेटपटूंची टीम इंडिया
-ड्रीम ११: फक्त कन्यारत्नं असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंची ड्रीम टीम…