इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा २१ वा सामना सोमवारी (२७ एप्रिल) पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात कोलकाताने ५ विकेट्सने बाजी आणि आपल्या पराभवाची मालिका खंडित केली. या सामन्यादरम्यान पंजाबच्या खेळाडूंनी त्यांचे उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केला. परंतु अखेर त्यांच्या हाती निराशा आली. दरम्यान पंजाबचा अष्टपैलू खेळाडू मोझेस हेन्रिक्स याने आपली विकेट वाचवण्यासाठी अनोखी शक्कल लढवल्याचे पाहायला मिळाले.
त्याचे झाले असे की, बाराव्या षटकापर्यंत पंजाबचा संघ ४ बाद ६० धावा अशा स्थितीत होता. त्यामुळे सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला हेन्रिक्स आपल्या संघाला भक्कम स्थितीत आणण्याच्या प्रयत्नात होता. यावेळी बारावे षटक टाकत असलेल्या सुनिल नारायणच्या पाचव्या चेंडूवेळी तो स्ट्राईकवर आला.
नारायणने टाकलेल्या किचकट चेंडूवर त्याने साधारण शॉट खेळत स्ट्राईक आपला संघ सहकारी निकोलस पूरनला देण्याचे ठरवले. परंतु तो चेंडू हेन्रिक्सच्या बॅटची कडा घेत मागे यष्टीरक्षक दिनेश कार्तिककडे गेला. आता यष्टीरक्षक कार्तिक झेल पकडत आपल्याला झेलबाद तर करणार नाही ना, हे पाहत असताना हेन्रिक्सच्या हातून बॅट सुटली आणि तिकडे कार्तिकच्या हातूनही झेल हुकला. परिणामत: हेन्रिक्स आणि पूरनने एक धाव संघाच्या खात्यात जोडली.
तसे तर, एखाद्या सामन्यात फलंदाजी करताना फलंदाजाच्या हातून बॅट निसटणे ही जास्त मोठी गोष्ट नाही. परंतु हेन्रिक्सने यष्टीरक्षक कार्तिकचे लक्ष विचलित करुन स्वतला झेलबाद होण्यापासून वाचवण्यासाठी मुद्दाम हातातली बॅट फेकली. याचा परिणामही सर्वांना दिसून आला.
https://twitter.com/lodulalit001/status/1386698744779841541?s=20
Lol… Moises Henriques…😀 😀 😀
— Aravind (@netcitizen) April 26, 2021
feels like I'm watching PSL when I see players Like Henriques Playing.
— ☔ (@_Gabbarrrr) April 26, 2021
https://twitter.com/Madhavi_2003/status/1386697099304185863?s=20
पण भलेही त्या चेंडूवर हेन्रिक्स बाद होण्यापासून बचावला. मात्र पुन्हा डावातील चौदावे षटक टाकण्यासाठी आलेल्या नारायणनने पहिल्याच चेंडूवर त्याची दांडी उडवली आणि ३ चेंडूत अवघ्या २ धावा हेन्रिक्सला पव्हेलियनला परतावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
नव्या वादाला आमंत्रण! भर सामन्यात डगआऊटमधून मॉर्गनला इशारा, कोडवर्डमध्ये दिले गेले सल्ले
भारतात एका दिवसात पॅट कमिन्स बनला हिरो, सोशलवर मानले जातायेत आभार; पाहा काही खास पोस्ट