---Advertisement---

रोहित शर्माकडे द्या भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद, इंग्लंडच्या माजी क्रिकेटरची मागणी

---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला होता. परंतु, या अंतिम सामन्यात भारताला विजय मिळवता आले नाही. अंतिम सामन्यात पराभव झाल्याने विराटच्या कर्णधार पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तसेच विराटला कर्णधार पदावरून हटवण्याची मागणी देखील सोशल मीडियावरून होत आहे. याच दरम्यान येणाऱ्या टी-20 विश्वचषक सामन्यांसाठी इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने रोहित शर्माला कर्णधारपद द्यावे, अशी मागणी केली आहे.

ही मागणी माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसर यांनी केली आहे. त्यांना असे वाटत आहे की, रोहित शर्माला भारतीय संघाच्या टी20 सामन्यांसाठी कर्णधारपद द्यावे. सध्या विराट तिन्ही प्रकारातील कर्णधारपद सांभाळतो. मागील काही दिवसांपासून असे म्हटले जात आहे की तिन्ही प्रकारात वेगवेगळे कर्णधार असायला पाहिजे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्टइंडीज, बांगलादेश आणि अफगाणिस्थान या देशांसह अनेक देशांमध्ये एकापेक्षा जास्त कर्णधार आहेत. परंतु भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघांमध्ये तिन्ही प्रकारात एकच कर्णधार आहे

परंतु, अनेक लोकांचे असे मत आहे की, विराट कोहलीवरील ताण कमी होण्यासाठी रोहितकडे कर्णधारपद देण्यात यावे. या अगोदरही अनेक तज्ञांनी असे म्हटले आहे की भारतीय संघाचे नेतृत्व करायची संधी रोहित शर्माला दिले पाहिजे. या अगोदर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक आणि निदहास ट्रॉफी जिंकली आहे.

इतकेच नव्हे तर रोहित शर्माने इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचे 2013 पासून नेतृत्व केले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने 5 वेळा विजेतेपद मिळवले आहे. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये कर्णधार म्हणून भारतीय संघाला 10 एकदिवसीय सामन्यांपैकी 8 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. तर 19 टी-20 सामन्यांपैकी भारतीय संघाला 15 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. तर फक्त 4 सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावे लागले.

मॉन्टी पानेसर म्हणाला की, “मला असं वाटते की रोहित शर्माला भारतीय संघाचे टी-20 सामन्यातील कर्णधारपद द्यावे. रोहित शर्माने मुंबई इंडियनसाठी उत्कृष्ट नेतृत्व केले आहे.” पानेसर पुढे म्हणाले की, “विराट कोहलीवर दबाव पडत असेल की जर भारतीय संघाने आगामी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये चांगले प्रदर्शन केले नाही किंवा आयसीसीच्या टी20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावे लागला, तर काय होईल तुम्हाला माहितीच असेल.”

पानेसर पुढे म्हणाले की, “मला असे वाटते की भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी काही अवघड नसेल. कारण इंग्लंड संघाकडे काइल जेमिसनसारखे खतरनाक गोलंदाज नाहीत आणि त्याच बरोबर इंग्लंड संघाचा फलंदाजीचा क्रमही तितका मजबूत नाही. यामुळेच मला असे वाटते की भारतीय संघ या सामन्यांमध्ये विजय मिळू शकेल.”

भारताला ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी-20 विश्वचषक होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 विराटचा चमचा म्हणून संबोधल्यानंतर इरफान पठाणने दिले चाहत्याला ‘असे’ सडेतोड उत्तर

आयपीएल २०२० दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूला नजर कमजोर असल्याची झाली जाणीव, करावी लागली शस्त्रक्रिया

साक्षी धोनीने शेअर केला हिमाचलचा मनमोहक व्हिडिओ; अनुष्का शर्मा, धनश्री वर्माने दिल्या खास प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---