भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा गेल्या काही वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. सातत्याने क्रिकेट खेळूनही तो अद्याप त्याचा जुना फॉर्म परत मिळवू शकला नाही. याच कारणामुळे चाहत्यांपासून क्रिकेटपटूंपर्यंत अनेकजण त्याच्यावर टिका करत आहेत. असे असतानाही भारताचे संघ व्यवस्थापन खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे असून त्याला संधी देत आहे. अशात इंग्लंडचे माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसर यांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय, BCCI) पैशांसाठी विराटला (Virat Kohli) संघातून वगळायला घाबरत आहे, असे पानेसर (Monty Panesar) यांचे म्हणणे आहे. विराटचे क्रिकेटविश्वात मोठे नाव आहे. तसेच त्याचा चाहतावर्गही (Virat Kohli’s Fan Following) मोठा असून त्याची ब्रँड व्हॅल्यूही जास्त आहे. याचमुळे जर विराटला संघातून बाहेर केले गेले, तर स्पॉन्सरशीपवर मोठा प्रभाव पडू शकतो. म्हणून खराब प्रदर्शनानंतरही बीसीसीआय विराटला संघातून बाहेर करत नसल्याचे म्हणणे पानेसर यांचे आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना पानेसर म्हणाले की, “विराटचे अगदी ख्रिस्तियानो रोनाल्डोसारखे आहे. जेव्हाही रोनाल्डो मँचेस्टर यूनायटेडसाठी खेळतो, तेव्हा प्रत्येकजण फुटबॉल पाहात असतो. विराटचेही तसेच आहे. जगभरात विराटचा चाहतावर्ग सर्वात जास्त आहे. त्यामुळे कदाचित बीसीसीआयसुद्धा स्पॉन्सर्सला आनंदाज ठेवण्याच्या दबावाखाली आहे, ज्यामुळे ते विराट कसाही खेळो पण त्याला संघातून बाहेर करत नाहीयेत. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ते विराटला संघातून वगळू शकत नाहीत. कारण यामुळे त्यांच्या स्पॉन्सरशीपवर (Sponsorship) मोठा परिणाम होईल.”
विराट २०१९ पासून एकही शतक करू शकला नाही. त्याचे सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यातील प्रदर्शन जरी पाहायचे झाले तर, त्याने अनुक्रमे ११, २०, १, ११ आणि १६ धावा केल्या आहेत. त्याचे हे निराशाजनक प्रदर्शन पाहता अनेकांनी त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी केली आहे. परंतु भारताचा कर्णधार रोहित शर्मा अजूनही त्याच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फाॅर्मात नसलेल्या कोहलीसाठी इंग्लंडच्या कॅप्टनची फलंदाजी; म्हणाला, ‘तुम्ही असे कसे….’
‘बुमराहपेक्षा कमी नाही आफ्रिदीचा जावई’, माजी क्रिकेटपटूचे मोठे भाष्य
भारताचा टर्मिनेटर हरभजन सिंग करणार क्रिकेट मैदानात पुनरागमन, पाहा कधी आणि कोणता सामना खेळणार